AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका क्षणात होत्याचं नव्हतं… 12 मिनिटांत 15 भीषण अपघात, गाडी स्पॉटवर जाताच…. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर काय घडलं?

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी अनेक भीषण अपघात घडले. महामार्गावर शुक्रवारी नऊ वाजताच्या सुमारास एक दोन नव्हे तर तब्बल 15 वाहनांचा खड्ड्यात आदळून अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. खड्ड्यात आदळल्याने अनेक वाहनांचे टायर फुटले आहेत. तर अनेकांच्या वाहनांचं भरपूर नुकसान झालं. परंतु या अपघाताच्या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पालघर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून […]

एका क्षणात होत्याचं नव्हतं... 12 मिनिटांत 15 भीषण अपघात, गाडी स्पॉटवर जाताच.... मुंबई-अहमदाबाद महामार्गावर काय घडलं?
| Updated on: Jul 03, 2026 | 2:46 PM
Share

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी अनेक भीषण अपघात घडले. महामार्गावर शुक्रवारी नऊ वाजताच्या सुमारास एक दोन नव्हे तर तब्बल 15 वाहनांचा खड्ड्यात आदळून अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. खड्ड्यात आदळल्याने अनेक वाहनांचे टायर फुटले आहेत. तर अनेकांच्या वाहनांचं भरपूर नुकसान झालं. परंतु या अपघाताच्या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पालघर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील विविध भागातील खड्ड्यात पाणी साचलं आहे. या पावसादरम्यान गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या महामार्गावर महालक्ष्मी येथील उड्डाणपुलावर दीड ते दोन फुटांचा खड्डा पडला आहे. या खड्ड्यातून व्हाईट टॅपिंगसाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. त्यामुळे महामार्गावर अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. या रस्त्यावर रात्रीच्या सुमारास वाहन चालकांना या खड्ड्याचा अंदाज येत नाहीये. या खड्ड्यामुळे खासगी वाहन तर काही अवजड वाहन अशा 15 वाहनांचं अपघात घडून मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने या अपघातांमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या वाढत्या अपघातामुळे वाहन चालक आणि प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय.

रस्त्यासाठी 620 कोटींचा खर्च

मागील वर्षी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर व्हाईट टॅपिंगसाठी तब्बल 620 कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला. त्यामुळे हा महामार्ग खड्डेमुक्त होईल, अशी आशा स्थानिकांसह वाहनचालक आणि प्रवाशांना होती. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करून देखील आजही या महामार्गाची दुरावस्था पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहन चालकांनी फक्त टोलचालकांचे खिसे भरायचे का, असा सवाल संतप्त वाहन चालकांकडून उपस्थित केला जातोय . आज पहाटे या खड्ड्यात माती टाकून हा खड्डा भरण्यात आला असला तरी पावसामुळे कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

एका अपघातग्रस्त चालकाने म्हटलं की, माझी कार अंदाजे ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने धावत होती. रस्त्यावरून अचानक वाहन खड्ड्याला आदळली. त्यानंतर रस्त्यावर उभ्या वाहनांना धडकली. मी कार दोन महिन्यांपूर्वी खरेदी केली होती. माझ्या कारचे दोन्ही टायर फाटले आहेत. प्रशासनाने माझी नुकसान भरपाई द्यावी’. महामार्गावरील वाढत्या अपघातामुळे रस्त्याचं बांधकाम आणि देखरेखीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. प्रशासनाने या रस्त्याची डागडुजी केली नाही, तर भविष्यात आणखी अपघाताच्या घटना घडतील. त्यामुळे तातडीने रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Follow Us
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर
कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे...
Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच...
पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
Mumai Rain Update | पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?