AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुकाराम मुंडेंच्या काळात कोणाचीही गय नाहीच, थेट नाशिकमध्ये मोठी कारवाई, तब्बल 20..

Nashik FDA Raid : अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार तुकाराम मुंडे यांनी आपल्या हातात घेतल्यापासून हॉटेल चालकांमध्ये मोठी खळबळ उडालीये. तुकाराम मुंडे यांच्याकडून जोरदार कारवाई केली जातंय. कोणाचीही गय केली जात नाही. यादरम्यान नाशिकसह वाशिममध्ये मोठी कारवाई हॉटेलवर करण्यात आली.

तुकाराम मुंडेंच्या काळात कोणाचीही गय नाहीच, थेट नाशिकमध्ये मोठी कारवाई, तब्बल 20..
Commissioner Tukaram Mundhe
| Updated on: Jul 04, 2026 | 11:08 AM
Share

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभर धडक कारवाई सुरू केल्या आहेत. कोणाचीही गय त्यांच्याकडून केली जात नाही. धाड धाड हॉटेलचे परवाने रद्द केली जात आहेत. हॉटेल्सच्या स्वयंपाक घरात जाऊन तपासणी केली जात आहे. भेसळयुक्तांना सळो की पळो करून सोडले जातंय. हॉटेलच्या स्वयंपाक घरात थोडीही घाण आणि अस्वच्छता आढळली की, त्यांच्याकडून परवाने रद्द केले जात आहेत. ही कारवाई कोण्या एका शहरात नाही तर राज्यभर सुरू आहे. भेसळयुक्तांचे धाबे दणाणले आहेत. मुंबईतील बड्या बड्या हॉटेलमध्येही त्यांनी कारवाई सत्र सुरू केले. आता एफडीएची कारवाई नाशिककडे वळली आहे. तुकाराम मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली एफडीएची नाशिक विभागात मोठी धडक कारवाई सुरू आहे. दोन दिवसांत तब्बल 20 हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील खाद्य पदार्थांची तपासणी करण्यात आली.

अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने तब्बव 7 नामांकित हॉटेल आणि रेस्टॉरंटचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आलीत. सुधारणा नोटीसचे पालन न करणाऱ्या आणखी रेस्टॉरंटवर देखील कारवाई होणार आहे. तुकाराम मुंडे यांच्या कार्यकाळात कोणालाही सुट्टी मिळणार नाही, हे स्पष्ट होत आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही.

तपासणीत स्वयंपाकघरात अस्वच्छता, माश्यांचा व घाणीचा सापळा, अन्नपदार्थ उघड्यावर ठेवल्याचे आढळले कारवाईदरम्यान आढळून आले. कोल्ड स्टोरेज व तापमानाच्या नियमांचे उल्लंघन देखील केले. अन्न दूषित होण्याचा धोका त्यामुळे निर्माण होतो. कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेच्या नियमांचे पालन न झाल्याचेही निदर्शनास अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष तपासणी मोहीम पुढेही सुरू राहणार आहे.

सर्वांनी या मोहिमेचा धसका घेतला आहे. तुकाराम मुंडे यांच्या राज्यात कोणाचाही गय होत नाही. वाशिमही अन्न सुरक्षा प्रशासनाची धडक कारवाई बघायला मिळतंय. शहरातील 3 हॉटेलांची तपासणी त्यापैकी साई ढाब्याचा अन्न सुरक्षा परवाना निलंबित तर हॉटेल गणेश आणि हॉटेल चिंतामणी या दोन हॉटेल ला सुधारणा करण्याची नोटीस देण्यात आली.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ