Elon Musk : एलन मस्क होणार अमेरिकेचा राष्ट्रपती; टाइम ट्रॅव्हलरची सर्वात मोठी भविष्यवाणी; आजवर एकही भाकीत खोटं ठरलं नाही
Time Traveler Predictions 2025 : जगाने डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या मैत्रीचे कौतुक केले. तर यामागे व्यापारी संबंध असल्याचा आरोप केला. दुसरीकडे टाईम ट्रॅव्हल्सने त्याचवेळी दावा केला होता की, ही मैत्री तुटणार आहे. आता त्याने मोठा दावा केला आहे.

व्हाईट हाऊसमधून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या मैत्रीची छायाचित्रं आता कदाचित पुढे येणार नाहीत. कारण त्यांच्यातील मैत्री तुटल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रपती निवडणुकीत दोघे हातात हात घालून अनेक ठिकाणी दिसले. मस्क याने ट्रम्प यांच्यासाठी जोरदार, तुफान प्रचार केला. 2024 मध्ये दोघांनी एकमेकांवर स्तुति सुमने वाहिली. त्याचवेळी एका टाईम ट्रॅव्हलरने या दोघांची मैत्री सहा महिन्यांच्या आत तुटेल आणि दोघे वेगळे होतील अशी भविष्यवाणी केली होती. त्यावर कोणी विश्वास ठेवला नव्हता. पण आता हे भाकीत खरं ठरत असल्याचे समोर येत आहे.
भविष्यवाणी म्हटलं की जगभरातील लोकांना बल्गेरियाची भविष्यवक्ती बाबा वेंगा आणि द ग्रेट नास्त्रेदमस तर आता जपानची रिओ तात्सुकी हिची आठवण येते. पण या टाईम ट्रॅव्हलरने सध्या जगभरात खळबळ उडवून दिली आहे. त्याने ट्रम्प आणि मस्क यांच्या मैत्रीविषयी केलेले भाकीत अगदी खरं ठरलं आहे. इतकेच काय तर त्याने यापूर्वी कोविड 19 विषयी केलेले भाकीत सुद्धा खरं ठरलं आहे.
डू कार्टिसचे भाकीत काय?
डू कार्टिस हा एक टाईम ट्रॅव्हलर आहे. त्याचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पेज सुद्धा आहे. त्यावर तो असे खळबळजनक दावे करत असतो. अर्थात यापूर्वी त्याच्याकडे जगाने फारसे लक्ष दिले नाही. टाईम ट्रॅव्हलर डू कार्टिस याने 2025 मध्ये ट्रम्प हे मस्क याला दुर्लक्षित करतील असा दावा केला होता. द सन या दैनिकाच्या दाव्यानुसार, ट्रम्प यांनी एलॉन मस्क याला प्रशासकीय कारभारातून पूर्णपणे बाजूला केले आहे.
एलॉन मस्क होतील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
इतकेच नाही तर कार्टिस यांनी वर्ष 2028 साठीची एक मोठी भविष्यवाणी केली आहे. जर मूळ निवासी नसलेल्या नागरिकांना अमेरिकन निवडणूक लढवण्याचा कायदा मंजूर झाला तर एलॉन मस्क हे पुढील राष्ट्राध्यक्षाची निवडणूक लढवतील. एलॉन मस्क आणि अर्नाल्ड श्वार्ज़ेनेगर यांच्यात हा सामना होईल. त्यात एलॉन मस्क बाजी मारेल असा दावा त्याने केला आहे.
This tweet aged well https://t.co/tUMtcLpZ57
— Drew Curtis (@DrewCurtis) May 1, 2020
आतापर्यंत बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांच्या भाकिताचा पडताळा झाला आहे. त्यातील अनेक भाकीतं खरी ठरल्याचे सांगण्यात येत आहे. कार्टिस यांनी वर्ष 2015 मध्ये 2020 मध्ये महामारी म्हणजे कोविड -19 विषयी भविष्यवाणी केली होती. अर्थात कर्टिसच्या भविष्यवाणीविषयी लोकांना साशंकता आहे. 2025 मध्ये तिसरे जागतिक युद्ध होणार नाही, मात्र या वर्षात नैसर्गिक आपत्ती कोसळतील असा दावा त्याने केला आहे. आता मस्क याचे भाकीत खरं ठरतं की चूक हे लवकरच समोर येईल.
