Ganesh Chaturthi 2021 : पूजा विधी, व्रत विधी, मंत्र आणि बरेच काही जाणून घ्या या विशेष सणाबद्दल

| Updated on: Sep 07, 2021 | 7:16 PM

याला 'विनायक चवथी' असेही म्हटले जाते, गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यात साजरी केली जाते जी साधारणपणे जॉर्जियन कॅलेंडरनुसार ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये येते. यावर्षी हा सण 10 सप्टेंबर 2021 रोजी येत आहे.

Ganesh Chaturthi 2021 : पूजा विधी, व्रत विधी, मंत्र आणि बरेच काही जाणून घ्या या विशेष सणाबद्दल
पूजा विधी, व्रत विधी, मंत्र आणि बरेच काही जाणून घ्या या विशेष सणाबद्दल
Follow us on

मुंबई : आपला सर्वांचा आवडता गणेश उत्सव सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. ‘विनायक चतुर्थी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सणाला एक विशेष महत्त्व आहे आणि संपूर्ण भारतात एक भव्य उत्सव साजरा केला जातो. नावावरुन कळते की, हा सण गणपतीच्या सन्मानार्थ साजरा केला जातो – भगवान शिव आणि देवी पार्वतीचा मुलगा भगवान गणेश यांचा जन्म या दिवशी झाला होता. (Ganesh Chaturthi 2021 : Know about pooja rituals, fasting rituals, mantras and much more about this special festival)

याला ‘विनायक चवथी’ असेही म्हटले जाते, गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यात साजरी केली जाते जी साधारणपणे जॉर्जियन कॅलेंडरनुसार ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये येते. यावर्षी हा सण 10 सप्टेंबर 2021 रोजी येत आहे आणि त्यानंतर 11 दिवसांचा गणेशोत्सव साजरा होणार आहे, ज्यामध्ये भक्त भजन गातात, प्रार्थना करतात आणि उपवास देखील करतात.

गणेश चतुर्थी : पूजा आणि अनुष्ठान

– या दिवशी, भक्त सकाळी लवकर उठतात आणि त्यांच्या घरातील देवघर स्वच्छ करतात.
– गणपतीची मूर्ती चौरंगावर ठेवून तिची पूजा केली जाते.
– दहा दिवस भक्तिभावाने अनुष्ठान केले जातात.
– दररोज गणपतीची आरती केली जाते आणि त्याला भोग अर्पण केला जातो.
– मोदक आणि इतर नैवेद्य दररोज अर्पण केले जातात कारण मोदक गणपतीला खूप प्रिय आहे.
– प्रसाद सर्वांमध्ये वाटला जातो.
– जेथे सार्वजनिक ठिकाणी गणपतीच्या मूर्ती बसवल्या जातात, तेथे विशाल विस्तारित देखावे केले जातात.
– लोक आदराने आणि उत्साहाने हे देखावे पहायला येतात.
– गणपतीची दररोज पूजा केली जाते आणि भोग दिला जातो.
– दहा दिवसांनंतर विसर्जन मिरवणूक भव्यतेने काढली जाते.

गणेश चतुर्थी : मंत्र

ऊं एकदंताय विधामहे, वक्रतुंडाय धिमही, तन्नो दंति प्रचोदयात्

ऊं वक्रतुंडायक नृत्यस्त्रय क्लिंग हिंग श्रृंग गण गणपतये वर वरदा सर्वजनं मे वाशमनय स्वाहा

वक्रतुंड महाकाय, सूर्य कोटि समप्रभः निर्विघ्नम कुरुमेदेव सर्व कार्येषु सर्वदा

गणेश गायत्री मंत्र

ऊं एकदंताय विधामहे, वक्रतुंडाय धिमही, तन्नो दंति प्रचोदयात्

वक्रतुंड मंत्र

ऊं वक्रतुंडायक नृत्यस्त्रय क्लिंग हिंग श्रृंग गं गणपतये वर वरदा सर्वजनं मे वाशमनय स्वाहा

दैनिक गणपती मंत्र

ऊं गं गणपतये नमः

नाम के साथ गणेश मंत्र

-ऊं गणध्याक्षय नमः

-ऊं गजाननाय नमः

-ऊं विघ्नाशय नमः

-ऊं गजकर्णकाय नमः

-ऊं विकातय नमः

-ऊं विनायकाय नमः

ऋण हर्ता मंत्र

ऊं गणेश ऋणं छिंदी वरेण्यम हूं नमः फट

शक्तिविनायक मंत्र

ऊं ह्रीं ग्रीं ह्रीं

गणेश मूल मंत्र

ऊं श्रीं ह्रीं क्लें ग्लौम गं गणपतये वर वरद सर्वजन जनमय वाशमनये स्वाहा तत्पुरुषाय विद्महे वक्रतुंडाय धिमहि तन्नो दंति प्रचोदयत ओम शांति शांति शांतिः (Ganesh Chaturthi 2021 : Know about pooja rituals, fasting rituals, mantras and much more about this special festival)

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.)

इतर बातम्या

विराटच्या एका निर्णयामुळे भारत जिंकला, जो रुटला ‘तीच’ गोष्ट जमली नाही, माजी दिग्गज इंग्लंड क्रिकेटपटूची प्रतिक्रिया

अडचणीत असलेल्या खरिपातील पिकांना ‘तरच’ मिळेल नवसंजीवनी..!