वाशिममध्ये हरिद्वार येथील शिवमहिमा कलाकारांचं पारंपरिक नृत्य, भक्तिमय वातावरणात गणेश मूर्तीची मिरवणूक

| Updated on: Sep 09, 2022 | 4:06 PM

शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हरिद्वार येथील शिवमहिमा नृत्य कलाकारांनी पारंपरिक नृत्याविष्कार सादर करून मिरवणूक मार्गात भक्तिमय वातावरण तयार केले.

वाशिममध्ये हरिद्वार येथील शिवमहिमा कलाकारांचं पारंपरिक नृत्य, भक्तिमय वातावरणात गणेश मूर्तीची मिरवणूक
Follow us on

वाशिम : आजच्या आधुनिक युगात इंटरनेटसह मनोरंजनाची नवनवीन साधने उपलब्ध आहेत. पारंपरिक वाद्यांची जागा आता डॉल्बी डिजेने घेतली. मात्र, वाशिम येथील बाप्पांची विसर्जन मिरवणूक पारंपरिक ढोल ताशा पथक, लेझीम पथक आणि विविध सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करून काढण्यात आली. वाशीम शहरातील गणेश (Ganesh) विसर्जन मिरवणूक महाराष्ट्रातील दीर्घकाळ चालणारी आहे. मिरवणुकीचा प्रारंभ आज सकाळी स्थानिक शिवछत्रपती शिवाजी महाराज चौकातून मानाच्या गणपतीची पूजा करून करण्यात आली. यावर्षी विसर्जन मिरवणुकीत (Procession) शहरातील 31 गणेश मंडळानी सहभाग घेतला आहे. यावर्षी सुद्धा विसर्जन मिरवणुकीमध्ये वाशिम येथील हेडा परिवाराच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच हरिद्वार येथील शिवमहिमा (Shiv Mahima) नृत्य कलाकारांनी पारंपरिक नृत्याविष्कार सादर करून मिरवणूक मार्गात भक्तिमय वातावरण तयार केले.

खासदार भावना गवळींनी धरला ठेका

वाशिम शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला आज सकाळी शिवाजी चौकातून सुरुवात झाली. वाशिम जिल्ह्यात दोन वर्षांनंतर यंदा धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटामाटात निघाली. यामध्ये वाशिमच्या खासदार भावना गवळी ह्या वाशिम शहरातील शिवाजी चौकात शिवशंकर मंडळाचा मानाचा गणपतीची पूजन केलं. आरती करून मिरवणुकीत सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी ढोल वाजवून ठेका धरला होता. यावेळी शिक्षक आमदार किरण सरनाईक होते. तसेच जेसीबीच्या साह्याने गणेशजी व शिवाजी महाराज फुलांचा वर्षाव केला. शिवसेना गट जिल्हा प्रमुख सुरेश मापारी,माजी नगर अध्यक्षांसह अनेक पदाधिकारी यांनी मिरवणुकीमध्ये डान्स करत सहभाग घेतला.

हे सुद्धा वाचा