AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Visarjan 2026 date and time : गणपती विसर्जन नक्की कोणत्या वेळी होणार? शुभ मुहूर्त, विधीची योग्य पद्धत जाणून घ्या

Ganesh Visarjan 2026 Muhurat date and time : गणपती बाप्पाचे उद्या विसर्जन आहे. हवेत उडणारा गुलाल आणि पुढच्या वर्षी लवकर या...असे सर्व चित्र आपल्याला उद्या बघायला मिळेल. उद्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाची एकच लगबग उद्या बघायला मिळेल.

Ganesh Visarjan 2026 date and time : गणपती विसर्जन नक्की कोणत्या वेळी होणार? शुभ मुहूर्त, विधीची योग्य पद्धत जाणून घ्या
Ganesh Visarjan
| Updated on: Sep 24, 2026 | 7:41 PM
Share

Ganesh Visarjan 2026 : ढोल ताशांचा दणदणाट, हवेत उडणारा गुलाल आणि पुढच्या वर्षी लवकर या…असे सर्व चित्र आपल्याला उद्या बघायला मिळेल. उद्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाची एकच लगबग उद्या बघायला मिळेल. गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका 24-24 तास चालतात. लोक मोठ्या संख्येने या मिरवणुकांमध्ये सहभागी होतात. दहा दिवस आपल्या घरांमध्ये आणि हृदयांत आनंद पसरवल्यानंतर आता आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा क्षण अत्यंत भावूक करणारा असतो. कोणालाही बाप्पांना निरोप द्यायला अजिबात आवडत नाही. हा दिवस फक्त विघ्नहर्त्याला निरोप देण्यासाठीच नाही तर भगवान श्री हरी विष्णूंच्या अनंत रूपांच्या भक्तीत तल्लीन होण्यासाठीचा एक भव्य उत्सवही आहे.

या वर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग जुळून येत आहे, जो देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची असीम कृपा मिळवून देणारा ठरेल. चला तर मग जाणून घेऊयात गणपती विसर्जनासाठीचे शुभ मुहूर्त, पूजेची योग्य पद्धत आणि या दिवसाशी संबंधित विशेष नियम जाणून घेऊयात. ज्यामुळे देवाची कृपा तुमच्यावर कायम राहिल.  जर तुम्हाला शास्त्रानुसार शुभ मुहूर्तावर बाप्पाचे विसर्जन आणि भगवान अनंताची पूजा करायची असेल, तर पंचांगात दर्शवलेल्या वेळा सर्वात योग्य ठरतील. त्यानुसार, बाप्पाचे विसर्जन करा.

शुभ मुहूर्त- सकाळी 6.12 वाजल्यापासून ते 10.42 पर्यंत शुभ वेळ आहे. अभिजीत मुहूर्त- दुपारी 11.48 ते दुपारी 12.36 पर्यंत. लाभ मुहूर्त- दुपारी 12.15 ते दुपारी 3.18 पर्यंत.

अनंत सूत्र बांधण्यासाठी आणि मुख्य पूजा करण्यासाठी सकाळी 6.12 ते दुपारी 12.36 हा काळ अत्यंत शुभ असेल.

गणपती विसर्जनाची विधी

बाप्पाचा निरोप घेताना ज्या श्रद्धेने आणि उत्साहाने तुम्ही त्यांचे स्वागत केले होते, त्याच भावनेने त्यांना निरोप द्या. सकाळची अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. पूजा घर स्वच्छ करता आणि बाप्पाचा जल अभिषेक करून घ्या. गणपती बाप्पााला गंद लावा. पिवळे फुल आणि दुर्वा अर्पित करा. धूप आणि दिवा लावून गणपती बाप्पाची आरती करा. मोदक प्रसाद बाप्पााला द्या. लाडू आणि फळे देखील बाप्पााला अर्पित करा. विसर्जन करण्यापूर्वी देवाला प्रार्थना करा. चुकून काही गोष्टी झाल्या असतील तर बाप्पाची माफी मारा. त्यानंतर आदरपूर्ण बाप्पाचे विसर्जन करा.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा