
प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की त्याच्याकडे पुरेसा पैसा असावा, ज्यामुळे आपलं आयुष्य हे आनंद आणि सुखात जाऊ शकेल. मात्र अनेकदा असं होतं की एखाद्या व्यक्तीची कमाई चांगली असते, मात्र त्याच्याकडे पैसा टिकत नाही, महिन्याच्या शेवटी त्याचा खिसा रिकामा होतो, त्यामुळे त्याच्यावर कर्ज घेण्याची वेळ येते. परंतु हे कसं टाळायचं? या समस्येवरील तोडगा प्रेमानंद महाराज यांनी सांगितला आहे.पैसा हा केवळ कमावण्यामुळे तुमच्या हातात टिकणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही बदल करावे लागतील, काही सवयी सोडाव्या लागतील असं प्रेमानंद महाराज यांनी आपल्या प्रवचनामध्ये म्हटलं आहे. चर तर मग जाणून घेऊयात प्रेमानंद महाराज यांनी काय म्हटलं आहे?
पैसा का टिकत नाही?
प्रेमानंद महाराज म्हणतात असे अनेक लोक आहेत, जे कोणताही विचार न करता आपल्या जवळ असलेला पैसा खर्च करतात. अनेक लोक दिखाव्यासाठी पैसा खर्च करतात. अनेक जण आपल्या नातेवाईक आणि मित्रांपासून प्रभावित होतात, त्यांच्या घरात ही वस्तू आहे, मग आपल्याही घरात पाहिजे, असं त्यांना वाटतं आणि गरज नसताना देखील ते त्या वस्तुंवर पैसा खर्च करतात.जर तुम्हाला पैशांची योग्य किंमत कळाली नाही तर कितीही प्रयत्न करा, तुमच्या हातात पैसा टिकूच शकणार नाही, असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे.
पैशांचा आदर करा – प्रेमानंद महाराज म्हणतात पैशाला केवळ खर्च करण्याची वस्तू समजू नका, हे तुम्हाला देवानं दिलेलं सर्वात शक्तिमान साधन आहे, त्यामुळे जे लोक पैशांचा योग्य आदर करतात, आणि हातात आलेला पैसा काळजीपूर्वक खर्च करतात त्यांच्याकडे धन वाढत जातं. मात्र जे लोक याकडे दुर्लक्ष करतात, त्यांच्या जीवनात कायम आर्थिक समस्या असतात. अशा लोकांनी कितीही पैसा कमावला तरी तो त्यांच्याकडे टिकत नाही, त्यामुळे पैशांची योग्य गुंतवणूक करा असा सल्ला प्रेमानंद महाराज यांनी दिला आहे.
दिखाव्यापासून वाचा – प्रेमानंद महाराज म्हणतात अनेक लोकांना अशी सवय असते की, ते सर्व गोष्टी केवळ दिखाव्यासाठी आणि लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी करतात. यामध्ये त्यांच्याकडे असलेला प्रचंड पैसा खर्च होतो, त्यांच्याकडे पैसा टिकत नाही, त्यांनी कितीही पैसा कमावला तर आर्थिक अडचणी कधीच अशा लोकांची पाठ सोडत नाहीत, त्यामुळे दिखाव्यापासून स्वत:ला वाचवा.
पैशांची बचत – प्रेमानंद महाराज म्हणतात जर तुम्ही हजार रुपये कमवत असाल तर त्यातील 25 टक्के हिस्सा हा बचत करा, तो पैसा कधीही खर्च करू नका, लक्षात ठेवा जेव्हा तुमच्यावर मोठं संकट येईल तेव्हा हाच पैसा तुमच्या उपयोगाला येणार आहे.
कर्ज घेऊ नका – प्रेमानंद महाराज म्हणतात व्यक्तीनं आपल्या आयुष्यात कधीही कर्ज घेता कामा नाही, कारण एकदा कर्ज घेतलं की तो त्या चक्रात गुंतत जातो, कर्जामुळे हातात पैसा टिकत नाही, तसेच व्यक्तीला ती सवय देखील लागते, नंतर तो आपल्या छोट्या-छोट्या गरजांसाठी देखील कर्ज घ्यायला सुरुवात करतो.