AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hanuman Jayanti 2023 : रोज वाचा हनुमान चालीसा मिळतील हे सात फायदे

हनुमान चालीसाचे (Hanuman Chalisa Upay) पठण केल्याने हनुमान जीची विशेष कृपा प्राप्त होते.  रोज हनुमान चालीसाचे पाठ केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात.

Hanuman Jayanti 2023 : रोज वाचा हनुमान चालीसा मिळतील हे सात फायदे
हनुमान चालिसा Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Apr 02, 2023 | 7:45 PM
Share

हनुमान जी या कलियुगातील जागृत देवता आहेत. ज्याला हनुमान जीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही. हिंदू धर्मात हनुमान चालीसाचे खूप जास्त महत्त्व आहे. हनुमान चालीसाचे (Hanuman Chalisa Upay) पठण केल्याने हनुमान जीची विशेष कृपा प्राप्त होते.  रोज हनुमान चालीसाचे पाठ केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. कसलीही समस्या असो, हनुमान चालीसाचा पाठ केल्याने समस्या दूर होते. हनुमान जी हे भगवान श्री रामांचे सर्वात मोठे भक्त आहेत. हनुमान चालीसामध्येही या गोष्टीचा उल्लेख आहे. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला रोज हनुमान चालीसाचे पठण करण्याचे फायदे सांगू.

हनुमान चालीसा वाचण्याचे सात फायदे

भीतीपासून मुक्ती मिळते

दररोज हनुमान चालीसाचे पाठ केल्याने भीतीपासून मुक्ती मिळते. आयुष्यात बर्‍याच वेळा एखाद्या व्यक्तीला अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून भीती वाटू लागते. हनुमान चालीसाचे पठण केल्याने कशाचीही भीती वाटत नाही.

आत्मविश्वास वाढतो

यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. बर्‍याच लोकांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो, ज्यामुळे त्यांना यश मिळवता येत नाही. दररोज हनुमान चालीसाचा पाठ केल्याने आत्मविश्वास वाढतो.

आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते

हनुमान चालीसाचे पठण केल्याने व्यक्तीला आर्थिक त्रासातून मुक्तता मिळते. जर तुम्हाला कर्जामुळे त्रास होत असेल तर दररोज हनुमान चालीसाचे पठण करावे. असे केल्याने आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास प्रारंभ होईल.

कामात व्यत्यय येत नाही

रोज हनुमान चालीसाचे पठण केल्यास कोणत्याही प्रकारच्या कामात अडथळा येत नाही. माणसाला प्रत्येक कामात यश मिळू लागते.

नकारात्मकता दूर होते

रोज हनुमान चालीसाचे पठण केल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो. जो व्यक्ती नियमितपणे हनुमान चालीसाचे पठण करतो त्याला स्वतः हनुमान संरक्षण देते.

रोगांपासून मुक्त व्हा

रोज हनुमान चालीसाचे पठण केल्यास अगदी मोठे आजारही बरे होतात. जो व्यक्ती दररोज हनुमान चालीसाचे पठण करतो तो आजारांपासून दूर राहतो.

इच्छा पूर्ण होतात

हनुमान चालीसाचे नियमित पाठ केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. हनुमानजीच्या भक्तांवर कोणाचीही वाईट नजर पडत नाही.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?