घरात कुठलीही तोडफोड न करता, या पद्धतीने दूर करा वास्तुदोष.. जाणून घ्या, वास्तुशास्त्रातील प्रभावी उपाय

घरातील कुठल्याही वस्तुंची अथवा कोपऱयाची तोडफोड न करता, वास्तुदोष कसा दूर करण्यात येईल याबाबत वास्तुशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहे. वास्तुशास्त्रात, काही प्रभावी उपायांबद्दल माहिती देण्यात आली आहे. ज्याचा अवलंब करणे अगदी सोपे आहे.

घरात कुठलीही तोडफोड न करता, या पद्धतीने दूर करा वास्तुदोष.. जाणून घ्या, वास्तुशास्त्रातील प्रभावी उपाय
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 14, 2022 | 5:20 PM

जीवनात समस्या येत-जात राहतात, पण त्यांचं वास्तव्य तुमच्या आयुष्यात किंवा घरात असेल तर ते भयावह परिस्थितीपेक्षा कमी नाही. खराब आरोग्य, नोकरी किंवा व्यवसायातील समस्या, तणावाखाली असणे किंवा पैशाची हानी यासारख्या समस्या बहुतेक लोकांच्या आयुष्यात असतात. एवढं करूनही आयुष्यात सुख-शांती (Happiness and peace) का मिळत नाही, हे त्यांना इच्छा असूनही समजत नाही. असं म्हटलं जातं की सगळं करूनही तणाव किंवा समस्या पाठ सोडत नाहीत, तर याचं कारण वास्तुदोष असू शकतात. नवीन घर बांधताना तुम्ही वास्तूची काळजी घेऊ शकता, पण जुने घर घेताना घरात वास्तुदोषानुसार (According to Vastudosha)बदल करणे प्रत्येकाला शक्य नसते. जर तुम्ही घराची तोड फोड न करता, वास्तू दोष दूर करू इच्छित असाल तर त्यासाठी वास्तुशास्त्रात उपायही (Measures in architecture) सांगण्यात आले आहेत.

किचनसाठी आग्नेय कोनाचा उपाय

अनेक वेळा लोक जबरदस्तीने किंवा नकळत घर खरेदी करतात ज्यामध्ये स्वयंपाकघराशी संबंधित वास्तू दोष असतो. यामध्ये स्वयंपाकघराची दिशा किंवा येथे ठेवलेल्या वस्तू वास्तुनुसार अव्यवस्थित होऊ शकतात आणि त्यामुळे वास्तुदोषामुळे घराची प्रगती ऱोखु शकते किंवा कौटुंबिक समस्या निर्माण होऊ शकतात. यावर मात करण्यासाठी घराच्या आग्नेय कोनात म्हणजे पूर्व-दक्षिण दिशेला लाल दिवा लावा. या दिशेला रोज सकाळी किंवा संध्याकाळी लाल ब्लप लावून ठेवा. स्वयंपाकघरातील दोष दूर केल्याने घरात सुख-समृद्धी येईल.

शनी यंत्र येथे ठेवा

जर तुम्हाला घराच्या पश्चिम दिशेला काही वास्तुदोष वाटत असेल तर ते दूर करण्यासाठी शनि यंत्राची मदत घ्या. यासाठी घरात शनियंत्र आणा आणि पश्चिम दिशेला व्यवस्थित लावा. ही पद्धत शुभ असते आणि घरात येणाऱ्या अडचणी जसे की पैशाची कमतरता, कुटुंबातील भांडणे इत्यादी दूर होतात.

येथे लावा हनुमानजींचे चित्र

घराच्या उत्तर आणि पश्चिम दिशेला असलेले वास्तू दोष दूर करण्यासाठी हनुमानजींचा आश्रय घेणे चांगले राहील. सर्व प्रकारचे संकट दूर करणाऱ्या हनुमानजींचे चित्र पश्चिम कोनात लावा. हनुमानजींचे हे चित्र घरात सकारात्मकता आणू शकते. तसेच रोज हनुमानजीची पूजा करायला विसरू नका.