रस्त्यात पडलेले पैसे घेणे शुभ की अशुभ? ते उचलण्यापूर्वी या 5 गोष्टी जाणून घ्या

आपल्याला बऱ्याचदा रस्त्याने चालताना रस्त्यात पैसै पडलेले दिसतात. त्यावेळी काहीजण ते पैसे उचलून स्वत:जवळ ठेवतात , तर काहीजण उचलत नाही. मग स्त्यावर पडलेले पैसे सापडल्यास ते शुभ आहे की अशुभ? तसेच ते पैसे उचलावे की नाही? हेही जाणून घेऊयात.

रस्त्यात पडलेले पैसे घेणे शुभ की अशुभ? ते उचलण्यापूर्वी या 5 गोष्टी जाणून घ्या
Is it auspicious or inauspicious to pick up money lying on the road? Know these 5 things before picking it up
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 23, 2025 | 1:10 AM

अनेकदा आपण चालताना रस्त्यावर एखादं नाणं किंवा नोट दिसते. म्हणजे रस्त्यावर पडलेले पैसे दिसतात. जेव्हा असे घडते तेव्हा बरेच लोक या पैशाचे काय करावे याबद्दल गोंधळलेले असतात. काही लोक ते उचलतात आणि स्वत: जवळ ठेवतात, तर काही लोक गरजू लोकांना देतात किंवा मंदिरात दान करतात. पण प्रश्न असा उद्भवतो: रस्त्यावर पडलेले पैसे उचलावेत का? रस्त्यात पैसे सापडणे शुभ असते की अशुभ जाणून घेऊयात.

रस्त्यावर पडलेले पैसे सापडणे शुभ आहे की अशुभ?

रस्त्यावर पडलेले पैसे, विशेषतः नाणी सापडणे हे खूप शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की रस्त्यावर नाणे सापडणे हे तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद दर्शवते. म्हणूनच, जर तुम्ही परिश्रमपूर्वक काम केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. चीनमध्ये, पैसे किंवा नाणी केवळ देवाणघेवाणचे साधन म्हणून पाहिले जात नाहीत तर ते सौभाग्याचे प्रतीक देखील मानले जातात.

रस्त्यात सापडलेले पैसे उचलावे की नाही?

जर तुम्हाला रस्त्यावर पडलेली नोट किंवा नाणे आढळले तर तुम्ही ते ताबडतोब उचलले पाहिजे. हे तुमच्या भविष्यासाठी एक शुभ संकेत आहे. याचा अर्थ देव तुमच्यासोबत आहे आणि तुम्हाला त्याचे आशीर्वाद मिळत आहेत. ही नोट किंवा नाणे इतर कोणालाही दान करू नये. तुमच्या पाकिटात किंवा पर्समध्ये वेगळे ठेवून द्यावे जेणेकरून चुकून खर्च होणार नाही.

दैवी शक्तीचा आशीर्वाद

जर तुम्हाला रस्त्यावर एक रुपया, पाच रुपया किंवा दहा रुपयाचे नाणे सापडले तर ते ऊर्जा आणि दैवी शक्तीचे प्रतीक समजा. नाणी धातूपासून बनलेली असतात आणि धातू दैवी शक्तीचे प्रतीक आहे. म्हणून, जर तुम्हाला नाणे सापडले तर समजून घ्या की देवीचा तुमच्यावर आशीर्वाद आहे.

महत्त्वाच्या कामासाठी कुठेतरी जात असाल तर…

तसेच वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी कुठेतरी जात असाल आणि त्या वेळी तुम्हाला वाटेत एक नाणे किंवा नोट पडलेली आढळली तर ते तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल याचे लक्षण आहे. जर तुम्ही कामावरून घरी परतत असाल आणि तुम्हाला वाटेत पैसे पडलेले आढळले तर हे लक्षण आहे की तुम्हाला लवकरच आर्थिक फायदा होणार आहे.

मंदिरात दान करा किंवा…

जर तुम्हाला रस्त्यावर पैसे पडलेले आढळले आणि तुम्हाला ते स्वत:जवळ ठेवायचे नसतील तर ते मंदिरात दान करा किंवा कोणा गरजू व्यक्तीला देऊन टाका. जर तुम्हाला रस्त्यावर पडलेले नाणे आढळले तर ते लवकरच तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता आणि या कामात तुम्हाला यश आणि पैसा दोन्हीही मिळेल असाही त्याचा अर्थ होतो.