Kartik Purnima 2026 : घरात पैशांची चणचण जाणवतेय? कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी करा हे 7 उपाय; देवी लक्ष्मीचा कायम राहिल आशीर्वाद
कार्तिक पौर्णिमा उद्या साजरी केली जाणार आहे. या पौर्णिमेच्या दिवशी घर दिव्यांनी उजळवण्याची प्रथा आहे. तसेच या दिवशी माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची आराधना केली जाते. या दिवशी आराधना केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांतता लाभते. माता लक्ष्मीला कसे प्रसन्न करावे जाणून घ्या.

कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेचा उपवास मंगळवारी 24 नोव्हेंबरला पाळला जाणार आहे. कार्तिक पौर्णिमेला देवी लक्ष्मी आणि चंद्रदेवांची पूजा करण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेला योग्य विधींनी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धन आणि सुख वाढते. कार्तिक पौर्णिमेला काही उपाय करून तुम्ही तुमच्या घरातून गरिबी दूर करू शकता. हिंदू पंचांगानुसार, कार्तिक पौर्णिमेचा उपवास, पूजा, स्नान आणि दान 24 नोव्हेंबर रोजी उदय तिथीला पाळले जाईल. जाणून घेऊया कार्तिक पौर्णिमेला धन आणि संपत्तीची देवी असलेल्या देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे उपाय.
1- कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री यंत्राची पूर्ण विधीपूर्वक पूजा करा. या यंत्राच्या पूजेमुळे तुमच्या घरात समृद्धी आणि भरभराट होईल.
2- कार्तिक पौर्णिमेला देवी लक्ष्मीला सात्विक खीर अर्पण करा. तुम्ही बदाम, केशर, शुद्ध गाईचे दूध किंवा मखाना वापरून खीर बनवून देवीला अर्पण करू शकता.
3- आर्थिक समस्यांवर मात करण्यासाठी आणि धन-संपत्तीच्या देवीला प्रसन्न करण्यासाठी, कार्तिक पौर्णिमेला सकाळी आणि संध्याकाळी श्री लक्ष्मी चालिसाचे पठण करावे.
4- कार्तिक पौर्णिमेला देवी लक्ष्मीला एक डोळा असलेला नारळ अर्पण करा. असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेला देवी लक्ष्मीला एक डोळा असलेला नारळ अर्पण केल्याने घरातील गरिबी दूर होते. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या प्रार्थनेदरम्यान हा एक डोळा असलेला नारळ देवीला अर्पण करा. दुसऱ्या दिवशी, हा नारळ तुमच्या तिजोरीत किंवा पैशांच्या कोठारात ठेवा. यामुळे तुमच्या घरात समृद्धी येईल.
5 – कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घराच्या कोणत्याही कोपऱ्यात अंधार ठेवू नका. कोपरान् कोपरा दिव्याने उजळू द्या. मुख्य दाराजवळ सगळ्यात आधी दिवा लावा. पौर्णिमेच्या रात्री घर दिव्यांनी उजळलेलं असू द्या.
6 – कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. धन आणि संपत्तीची देवी लक्ष्मीचा प्रचंड आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि घरातील सुख-समृद्धी वाढवण्यासाठी, शक्य असल्यास कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करता येते.
7 – कार्तिक पौर्णिमेला गरीब आणि गरजू लोकांना आपल्या क्षमतेनुसार दान करा. अन्न, पाणी, कपडे, पैसे, फळे, तूप, भांडी, धणे इत्यादी दान करा.