घरात या शुभ गोष्टी असल्याच पाहिजे; माता लक्ष्मीची कृपा कायम राहिल, कधीही होणार नाही धनाची कमतरता

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, घरात काही विशिष्ट वस्तू ठेवल्याने लक्ष्मीची कृपा मिळते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच धन, समृद्धी आणि मानसिक शांती प्राप्त होते. पाहुयात त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या.

घरात या शुभ गोष्टी असल्याच पाहिजे; माता लक्ष्मीची कृपा कायम राहिल, कधीही होणार नाही धनाची कमतरता
Keep these few things in your home to retain the blessings of Lakshmi
Image Credit source: tv9 hindi
| Updated on: Jun 09, 2025 | 7:36 PM

भारतात वास्तूशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या गोष्टींना मानलं जातं. त्यातील काही गोष्टी या नक्कीच पाळल्या जातात. त्यामुळे वास्तूशास्त्रात सांगितल्याप्रमाणे काही वस्तू जर घरात असतील तर नक्कीच लक्ष्मीची कृपा होते असं म्हटलं जातं. माता लक्ष्मीला धन, वैभव आणि समृद्धीची देवी मानले जाते. असे मानले जाते की जर काही खास वस्तू घरात योग्य दिशेने आणि ठिकाणी ठेवल्या तर माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते. ज्योतिष आणि वास्तुनुसार, प्रत्येक घरात काही गोष्टी असाव्यात, ज्या केवळ संपत्ती वाढविण्यास मदत करत नाहीत तर मानसिक आणि भावनिक शांती देखील देतात.

घरात कोणत्या गोष्टी असाव्यात

1. तुळस

तुळशीचे रोप केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच खास नाही तर ते हवा शुद्ध करते. घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत पूर्वेकडे लावा आणि दररोज पाणी अर्पण करा. याशिवाय मनी प्लांट, शमी आणि पिंपळ यांसारखी झाडे देखील वातावरणात सकारात्मक ऊर्जा पसरवतात.

2. देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो

घराच्या ईशान्य दिशेला किंवा पूजास्थळी देवी लक्ष्मीचे शांत आणि हसरे रूप ठेवा. जर तुम्ही दररोज भक्तीभावाने दिवा लावून तिची पूजा केली तर घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि मानसिक संतुलन देखील राखले जाईल.

3. कुबेरांची मूर्ती

संपत्तीचे देवता कुबेरांची मूर्ती घरात किंवा ऑफिसच्या ठिकाणी उत्तर दिशेला ठेवणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. यामुळे घराची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि संपत्तीही अबाधित राहते.

4. शंख

हा शुभ आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानला जातो. पूजास्थळी तो पूर्व दिशेला ठेवा आणि नियमित पूजा करताना तो वाजवला तर नक्कीच लात्र होतात. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि घराचे वातावरण शुद्ध राहते.

5. हत्तीची मूर्ती

हत्ती हा शक्ती, ज्ञान आणि शांतीचे प्रतीक आहे. घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला हत्तींची जोडी ठेवल्याने घरात सुरक्षा आणि समृद्धी राहते. तसेच नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू देत नाही.

6. क्रिस्टल (स्फटिक)

घराच्या शांत कोपऱ्यात क्रिस्टल बॉल, पिरॅमिड किंवा कासव ठेवल्याने मानसिक शांती मिळते. या गोष्टी ताण कमी करतात आणि मन स्थिर करतात. हे ऑफिसमध्ये डेस्कवर देखील ठेवता येतात.

7. माशांची जोडी 

घरात फिश टॅंक ठेवणे खूप शुभ मानले जाते, विशेषतः जर त्यात सोनेरी किंवा रंगीत माशांची जोडी असेल तर. टॅंक उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावा. ते केवळ घराचे सौंदर्य वाढवत नाही तर प्रेम, शुभेच्छा आणि समृद्धी देखील आणते.

8. कमळाचे फूल किंवा चिन्ह

कमळ हे देवी लक्ष्मीचे आवडते फूल आहे. पूजागृहात त्याचे चित्र किंवा चिन्ह ठेवल्याने देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद मिळतात. यामुळे मन शांत राहते आणि घरात शुभता राहते.

9. पूजेची घंटी

जेव्हा घरात दररोज पूजेची लहान घंटी वाजते तेव्हा नकारात्मकता निघून जाते. ती सकारात्मक ऊर्जा सक्रिय करते आणि घराचे वातावरण शांत करते.