Ram Navami 2022 : रामनवमी उत्सवासाठी शिर्डीत लाखो साईभक्त दाखल, पाहा खास फोटो!

रामनवमी उत्सवासाठी शिर्डीत लाखो साईभक्त दाखल झाले आहेत. कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने यावर्षी मोठा उत्साह साईभक्तांमध्ये दिसुन येतो आहे. रामनवमी उत्सव शिर्डीत तीन दिवस साजरा केला जातो. आज उत्सवाचा मुख्य दुसरा दिवस असून दिवसभर विविध कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने साजरे केले जात आहेत. या वर्षी पालख्या घेऊन येण्यास परवानगी असल्याने राज्यभरातून साईनामाचा जयघोष करत शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.

| Updated on: Apr 10, 2022 | 8:34 AM
1 / 6
रामनवमी उत्सवासाठी शिर्डीत लाखो साईभक्त दाखल झाले आहेत. कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने यावर्षी मोठा उत्साह साईभक्तांमध्ये दिसुन येतो आहे. रामनवमी उत्सव शिर्डीत तीन दिवस साजरा केला जातो.

2 / 6
Ram Navami 2022 : रामनवमी उत्सवासाठी शिर्डीत लाखो साईभक्त दाखल, पाहा खास फोटो!

3 / 6
सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत आज रामनवमीचा मोठा उत्साह बघायला मिळतोय. आज दुपारी 12 वाजता साई मंदिरात रामजन्माचे स्वागत केले जाईल.

4 / 6
भाविकांची होणारी संभाव्य गर्दी पाहता आज साईमंदिर रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. दरम्यान सकाळपासुनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलीय.

5 / 6
भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असुन साईनामाच्या जयघोषाने दुमदूमून गेलीय. आज रामनवमीचा मुख्य दिवस असल्याने पहाटेच्या काकड आरतीनंतर साई प्रतिमा , विणा आणि पोथीची शोभा मिरवणुक पार पडली.

6 / 6
भाविकांनी कावडीतून आणलेल्या गंगाजलाने साईमुर्ती आणि समाधीला जलाभिषेक करण्यात आला. गंगाजल घेऊन येणा-यांची संख्या हजारोत असल्याने मंदिराबाहेर प्रतिकात्मक साई मुर्तीला अभिषेक करण्यात आला आहे.