Lucky Moles on Hand : हातावर ‘या’ ठिकाणी असेल तीळ तर मिटेल पैशांची चिंता!

Lucky Moles on Hand : शरीरावरील लहान तीळ देखील व्यक्तीची आर्थिक स्थिती, स्वभाव आणि जीवनाची दिशा दर्शवितात असं सामुद्रिक शास्त्रात म्हटलं आहे. शरीराच्या काही भागांवरील तीळ हे अफाट संपत्ती, आनंद आणि समृद्धीचे लक्षण मानले जातात. तळहाताच्या कोणत्या भागात तीळ असणे चांगले मानले जाते ते जाणून घेऊया.

Lucky Moles on Hand : हातावर या ठिकाणी असेल तीळ तर मिटेल पैशांची चिंता!
हातावरचा तीळ काय सांगतो ?
| Updated on: Jan 11, 2026 | 10:33 AM

आपल्या अंगावरील, शरीरावरील लहान तीळ देखील व्यक्तीची आर्थिक स्थिती, स्वभाव आणि जीवनाची दिशा दर्शवतात असं सामुद्रिक शास्त्रात म्हटले आहे . शरीराच्या काही भागांवरील तीळ हे अफाट संपत्ती, आनंद आणि समृद्धीचे लक्षण मानले जातात. अशा लोकांना आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. आज आपण तळहातावर असलेल्या अशाच एका तीळाबद्दल जाणून घेणार आहोत, जो खूप भाग्यवान मानला जातो.

हातावर असेल असा तीळ असेल तर पैशाची कमतरता जाणवत नाही

सामुद्रिक शास्त्रानुसार, लाल तीळांपेक्षा काळे तीळ अधिक शुभ मानले जातात. असे म्हटले जाते की तीळ जितका गडद, ​​स्पष्ट आणि अधिक ठळक असेल तितका त्याचा प्रभाव चांगला आणि मजबूत असतो. ज्योतिषांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीच्या मूठ बंद करताना त्याच्या तळहातावर तीळ लपलेला असेल तर तो व्यक्ती अत्यंत भाग्यवान असतो. हे अफाट संपत्तीचे लक्षण असतं असं सामुद्रिक शास्त्र सांगतं.

लक्ष्मीची विशेष कृपा

अशा लोकांना आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. जर उजव्या तळहातावर तीळ स्पष्ट, खोल आणि ठळक असेल तर ते आणखी महत्त्वाचे मानले जाते. असे म्हटले जाते की अशा लोकांच्या कुटुंबांना सात पिढ्यांपर्यंत संपत्ती पुरते, कमी होत नाही. अशा व्यक्ती आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असतात. त्यांना देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो.

मात्र ज्या व्यक्तीच्या तळहातावर असा तीळ असतो त्याने आक्रमकता आणि अहंकार टाळावा. त्यांनी आपल्या वागण्यात साधेपणा आणि नम्रता राखली पाहिजे असंही सामुद्रिक शास्त्रात नमूद करण्यात आलं आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच आमचा अंधश्रद्धेला दुजोरा नाही)