Chandra Grahan 2021 : ग्रहणकाळात या मंत्रांचा जप करा, सर्व दु:ख दूर होतील, धनलाभही होईल

| Updated on: Nov 19, 2021 | 1:12 PM

चंद्रग्रहणाच्या (Chandra Grahan 2021) वेळी चंद्र आणि सूर्यग्रहण दरम्यान सूर्य खूप त्रासात असतात, असं हिंदू धर्मात मानले जाते. म्हणून कोणत्याही प्रकारचे ग्रहण अशुभ घटना मानले जाते. ग्रहणाच्या काही तास आधी सुतककाळ सुरु होते आणि ग्रहण संपेपर्यंत पूजा करण्यास मनाई असते. परंतु यावेळी मानसिक जप अत्यंत प्रभावी मानले गेले आहे.

Chandra Grahan 2021 : ग्रहणकाळात या मंत्रांचा जप करा, सर्व दु:ख दूर होतील, धनलाभही होईल
Lunar-Eclipse
Follow us on

मुंबई : चंद्रग्रहणाच्या (Chandra Grahan 2021) वेळी चंद्र आणि सूर्यग्रहण दरम्यान सूर्य खूप त्रासात असतात, असं हिंदू धर्मात मानले जाते. म्हणून कोणत्याही प्रकारचे ग्रहण अशुभ घटना मानले जाते. ग्रहणाच्या काही तास आधी सुतककाळ सुरु होते आणि ग्रहण संपेपर्यंत पूजा करण्यास मनाई असते. परंतु यावेळी मानसिक जप अत्यंत प्रभावी मानले गेले आहे.

असे मानले जाते की ग्रहण काळात मंत्राचा जप केल्यास तो मंत्र सहज सिद्ध होतो. यानंतर त्या मंत्राचा जप केल्याने अनेक लाभ होतात. शुक्रवार, 19 नोव्हेंबर रोजी चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण दुपारी 12.48 वाजता सुरु होईल आणि 4.17 वाजता संपेल. अशा स्थितीत या मंत्रांचा जप केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व दु:ख दूर होऊ शकतात.

आजारातून मुक्त होण्यासाठी

ग्रहण काळात रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा मानसिक जप करावा. रुद्राक्षाच्या माळेने या मंत्राचा जप करा. यामुळे व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात आणि आयुष्यातील अनेक दुःखे कमी होतात. ग्रहण काळात जप केल्यानंतर रुद्राक्षाची जपमाळ ठेवावी. या माळेने दररोज या मंत्राचा जप करावा. यामुळे तुमच्या असाध्य आजारातही हळूहळू आराम मिळू लागेल.

इच्छा पूर्ण करण्यासाठी

जर तुम्हाला कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करायची असेल तर ग्रहणाच्या वेळी कोणत्याही शिव मंत्राचा जप करा. ‘ॐ नमः शिवाय’ हा जप सर्वोत्तम आहे. आपण यासाठी इतर शिव मंत्र देखील सिद्ध करु शकता. यानंतर, कोणत्याही मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही या सिद्ध मंत्राचा जप करु शकता.

शत्रूमुक्त होण्यासाठी

शत्रूंवर विजय मिळवायचा असेल, तर देवी बगुलामुखीचा ‘ॐ ह्लीं बगलामुखी देव्यै सर्व दुष्टानाम वाचं मुखं पदम् स्तम्भय जिह्वाम कीलय-कीलय बुद्धिम विनाशाय ह्लीं ॐ नम:’ या मंत्राचा जप करा. खटल्यात विजय मिळवण्यासाठी ‘ॐ ह्लीं बगलामुखी सर्वदुष्टानां वाचं मुखं पदं स्तंभय जिह्ववां कीलय बुद्धि विनाशय ह्लीं ओम् स्वाहा’ या मंत्राचा जप करा. या मंत्राचा जप करताना ‘सर्वदुष्टानां’ ऐवजी ज्याच्यापासून सुटका हवी आहे त्याचे नाव घ्या.

धन प्राप्तीसाठी

जर कुटुंबात आर्थिक समस्या असतील तर ‘ॐ श्रीं ह्रीं क्लीं ऐं ॐ स्वाहा’ या मंत्राचा जप करणे खूप उपयुक्त ठरेल. याशिवाय नोकरीत बढती आणि व्यवसायात नफा मिळवण्यासाठी ‘ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद-प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नम:’ या मंत्राचा जप करावा. वाक्सिद्धीसाठी ‘ॐ ह्लीं दुं दुर्गाय: नम:’ या मंत्राचा जप करावा.

एक मंत्रजापाने मिळेल एक लाख मंत्राचे फळ

ज्योतिषी डॉ. अरविंद मिश्रा यांच्या मते ग्रहण काळात केलेला मंत्रजप खूप महत्त्वाचा असतो. या एकवेळच्या मंत्राच्या जपाचा दशलक्ष पट परिणाम मिळतो. यामुळेच या काळात कोणताही मंत्र सहज सिद्ध करता येतो. पण एखादा मंत्र तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा तो पाठ करणाऱ्याच्या मनात पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असेल. तसेच मंत्राचा कधीही गैरवापर करु नका अन्यथा भविष्यात त्याचे विपरित परिणाम भोगावे लागू शकतात.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chandra Grahan 2021 : जाणून घ्या कुठे आणि कधी दिसणार वर्षातलं शेवटचे चंद्रग्रहण

Lunar eclipse 2021 for pregnant ladies | शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण, या दिवशी गर्भवती महिलांनी 4 गोष्टी चुकूनही करू नये