Maha Shivaratri 2022 | महाशिवरात्री कधी आहे, जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत

महाशिवरात्री 2022: हिंदू धर्मात महाशिवरात्री या सणाला खूप महत्त्व आहे. फाल्गुन महिन्यात महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. या दिवशी भक्त भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि पूजा करतात.

Maha Shivaratri 2022 | महाशिवरात्री कधी आहे, जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत
Maha-Shivaratri-2022
| Updated on: Feb 10, 2022 | 9:04 AM

मुंबई :  महा शिवरात्री 2022 (Maha Shivaratri 2022) हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. भगवान शंकराची पूजा करून हा सण साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, महा शिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशीला साजरी केली जाते . यंदा महाशिवरात्री १ मार्च रोजी साजरी करणार आहेत. हिंदू पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वतीचा (Mahashivratri 2022) विवाह झाला होता. महाशिवरात्रीच्या विशेष मुहूर्तावर भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भाविक उपवास करतात. माता पार्वतींप्रमाणेच मुलीही इच्छित वर मिळविण्यासाठी उपवास ठेवतात आणि सर्व विधींचे पालन करून त्यांची पूजा करतात. या दिवशी उपवास केल्याने सौभाग्य प्राप्त होते, असेही मानले जाते.

याशिवाय या दिवशी भगवान शंकराची आराधना केल्याने जीवनातील सर्व संकटे आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते, असेही मानले जाते. या दिवशी भगवान शिवासोबत पार्वतीचीही पूजा केली जाते. जाणून घेऊया महाशिवरात्रीची तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा करण्याची योग्य पद्धत.

शिवरात्रीचा शुभ काळ

यंदा महाशिवरात्रीचा शुभ दिवस मंगळवार, 1 मार्च रोजी पहाटे 3.16 पासून सुरू होणार आहे. चतुर्दशी तिथी बुधवार, 2 मार्च रोजी सकाळी 10 वाजता समाप्त होईल. महाशिवरात्रीला चार चरणात पूजा केली जाते. पूजेसाठी चार चरणात शुभ मुहूर्त आहेत.

पहिल्या टप्प्यातील पूजा – 1 मार्च रोजी संध्याकाळी 6.21 ते 9.27 पर्यंत

दुसऱ्या टप्प्यातील पूजा – 1 मार्च रात्री 9.27 ते 12.33 पर्यंत

तिसऱ्या टप्प्यातील पूजा – 2 मार्च रोजी दुपारी 12.33 ते 3.39 वा.

पूजेचा चौथा टप्पा – 2 मार्च रोजी पहाटे 3.39 ते 6.45 पर्यंत

शिवरात्रीची पूजा पद्धत

फाल्गुन महिन्यातील महाशिवरात्री ही वर्षातील सर्वात मोठी शिवरात्री मानली जाते. ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून दिवसाची सुरुवात करा. यानंतर घरातील पूजेच्या ठिकाणी पाण्याने भरलेला कलश स्थापित करा. नंतर शिव आणि माता पार्वतीच्या मूर्ती कलशात ठेवा.

अक्षत, पान, सुपारी, रोळी, मोली, चंदन, लवंग, वेलची, दूध, दही, मध, तूप, धतुरा, बेलपत्र, कमलगट्टा आणि फळे भगवान शिव आणि माता पार्वतीला अर्पण करा. भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा आणि शेवटी आरती करा.

शिवरात्रीची पूजा मंत्र

या दिवशी लोक महामृत्युंजय आणि शिव मंत्राचे पठण करतात.

महामृत्युंजय मंत्र – ओम त्र्यंबकम् यजमाहे सुगंधीम पुष्टीवर्धनम्. उर्वरुकमिव बंधनं.

शिव मंत्र – ओम नमः शिवाय

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

10 February 2022 Panchang | 10 फेब्रुवारी 2022, जाणून घ्या गुरुवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, आयुष्याची नवी दिशा देणारे ‘दासबोध’ , आज समर्थ रामदासांच्या दासबोधाची जयंती

बिंदिया चमकेगी.. ! जाणून घ्या कपाळावर कुंकू आणि टिकली लावण्याचे फायदे आणि त्यामागील वैज्ञानिक कारण…