Vastu Shastra : या पाच वस्तू आवश्य घरात ठेवा, लवकरच होईल भाग्योदय, होईल पैशांचा वर्षाव
वास्तुशास्त्रामध्ये काही गोष्टी या अत्यंत शुभ माण्यात आल्या आहेत. या वस्तू घरात ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. या वस्तूंमुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन, सुख, समृद्धी येते.

अनेकांसोबत असं घडतं की सगळं सुरळीत सुरू असतं, परंतु अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं. घरात काहीही कारण नसताना कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांसोबत वाद सुरू होतात. पती-पत्नीचं पटत नाही. मानसिक शांतता लाभत नाही, हा सर्व परिणाम तुमच्या घरात वाढलेल्या नकारात्मक ऊर्जेचा असू शकतो. यालाच वास्तुशास्त्राच्या भाषमध्ये वास्तुदोष असं देखील म्हटलं गेलं आहे. वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार अशा काही वस्तू असतात, ज्या घरात ठेवणं अत्यंत शुभं मानलं गेलं आहे. या वस्तू जर तुम्ही घरात ठेवल्या तर सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन, घरात लक्ष्मीचं आगमन होतं. घरात सुख, शांती येते. घरावर सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.
बासरी – वास्तुशास्त्रामध्ये बासरीला अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. बासरी हे सुख शांतीचं प्रतिक आहे. जर घरात सतत वाद होत असतील, कुटुंबातील सदस्यांचं एकमेकांसोबत पटत नसेल तर घरात बासरी ठेवावी असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे घरातील दोष दूर होऊन घरात सुख शांती येते.
शंख- वास्तुशास्त्र तसेच हिंदू धर्मशास्त्रामध्ये शंखाला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. देवघरामध्ये एक तरी शंख असावा असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. जर तुम्ही दररोज शंखनाद ऐकला तर तुमच्या सर्व समस्या हळुहळु कमी होत जातात. तसेच घरात सुख, शांती येते असं वास्तुशास्त्रत सांगण्यात आलं आहे.
हत्तीची मूर्ती – वास्तुशास्त्रामध्ये हत्तीच्या मूर्तीला अत्यंत शुभ मानलं जातं. ज्या घरात हत्तीची मूर्ती असते,स त्या घरात कधीही पैशांची कमी भासत नाही, सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. यासोबतच धावत्या घोड्याची मूर्ती आणि उगवत्या सूर्याचा फोटो देखील तुम्ही घरात ठेवू शकतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)