Navratri 2022: शारदीय नवरात्रीत बनत आहे विशेष योग, यंदाची घटस्थापना आहे दरवर्षीपेक्षा विशेष

| Updated on: Sep 22, 2022 | 5:55 PM

यंदाचे शारदीय नवरात्र दरवर्षीपेक्षा विशेष असणार आहे. यंदाच्या नवरात्रात देवीचे वाहन हत्ती असणार आहे. हत्ती म्हणजे भरभराटीचे प्रतीक आहे.

Navratri 2022: शारदीय नवरात्रीत बनत आहे विशेष योग, यंदाची घटस्थापना आहे दरवर्षीपेक्षा विशेष
घटस्थापना
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई,  सर्वपितृ अमावस्येच्या (Sarva Pitru Amawasya) दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. यावर्षी शारदीय नवरात्रीची (Navratri 2022) सुरुवात 26 सप्टेंबरपासून होईल आणि त्यानंतर 5 ऑक्टोबरला दसरा किंवा विजयादशमी (Vijayadashmi) उत्सव साजरा केला जाईल. माता दुर्गेच्या  उपासनेचा हा 9 दिवसांचा सण या वर्षी अतिशय शुभ योगाने सुरू होत आहे. या शुभ मुहूर्तावर घटस्थापना केल्याने लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी येईल अशी मान्यता आहे. गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब-हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये शारदीय नवरात्री आणि दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

 

काय आहे शुभ योग

26 सप्टेंबर 2022 पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसाठी संपूर्ण दिवस अतिशय शुभ असेल. यादरम्यान शुक्ल आणि ब्रह्मयोगाचा अप्रतिम संगम तयार होत आहे. जी धार्मिक पूजा आणि शुभ कार्यांसाठी अत्यंत शुभ मानली जाते. यानंतर सोमवार, 3 ऑक्टोबर रोजी महाष्टमीची व्रत-पूजा होणार आहे. दुर्गापूजेसाठी, अष्टमी-नवमी तिथीच्या संधि पूजेचा मुहूर्त दिवसाच्या 3:36 ते 4:24 पर्यंत असेल. त्याच वेळी, महानवमी तिथी मंगळवार, 4 ऑक्टोबर रोजी असेल. नवमी तिथी दुपारी 01.32 पर्यंत राहील. यानंतर दशमी तिथी सुरू होईल. त्यामुळे विजयादशमी किंवा दसरा सण 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी दुर्गा मूर्तींचे विसर्जन केले जाते, रावणाचे दहन केले जाते आणि त्यासोबत शस्त्रे व वाहनांची पूजा केली जाते.

हे सुद्धा वाचा

हत्तीवर स्वर होऊन येणार आहे माता दुर्गा

यंदा अश्विन महिन्यातील नवरात्रीमध्ये माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येत आहे. हत्ती वाहन हे अतिशय शुभ मानले जाते. हत्ती हे संपन्नतेचे प्रतिक आहे. माता दुर्गेची हत्तीची सवारी शेती आणि पिकांसाठी शुभ मानली जाते. यंदाचे नवरात्र हे आर्थिक भरभराटीचे आणि उन्नतीचे ठरणार आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)