AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता युद्ध मैदानाबाहेर.., फक्त इस्त्रायल, अमेरिकाच नाही तर संपूर्ण जग मोठ्या संकटात, इराणची घाम फोडणारी धमकी

मोठी बातमी समोर येत आहे, इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. सुरू असलेल्या या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इराणने आतापर्यंतची सर्वात मोठी धमकी दिली आहे. त्यामुळे संपूर्ण जगाची झोप उडण्याची शक्यता आहे.

आता युद्ध मैदानाबाहेर.., फक्त इस्त्रायल, अमेरिकाच नाही तर संपूर्ण जग मोठ्या संकटात, इराणची घाम फोडणारी धमकी
Mojtaba KhameneiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 20, 2026 | 10:12 PM
Share

युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे, आज युद्धाचा 21 वा दिवस आहे. या युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. याचदरम्यान आता इराणकडून अमेरिका आणि इस्त्रायलला मोठी धमकी देण्यात आली आहे. मात्र या धमकीमुळे संपूर्ण जगाची झोप उडण्याची शक्यता आहे. जगभरातील पार्क, मनोरंजन क्षेत्र आणि पर्यटनस्थळं इथून पुढे इराणच्या शत्रूंसाठी सुरक्षित नसतील अशी थेट धमकी इराणी सैन्याच्या मुख्य प्रवक्त्याकडून देण्यात आली आहे. इराणी सैन्य दलाचे मुख्य प्रवक्ता अबोलफजल शेकरची यांनी शुक्रवारी इराणच्या सरकारी न्यूज चॅनलला मुलाखत देताना अमेरिका आणि इस्त्रायलला ही धमकी दिली आहे. आता इथून पुढे इराणच्या शत्रूंसाठी जगातील कोणतीच जागा सुरक्षित नसेल असं शेकरची यांनी म्हटलं आहे.

जगाची झोप उडाली

दरम्यान इराणच्या या धमकीनंतर जगभरातल्या देशांची चिंता वाढली आहे. या धमकीनंतर असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे की, मध्य पूर्वेच्या बाहेर ज्या -ज्या देशात इस्त्रायल आणि अमेरिकेचे समर्थक आहेत, त्या ठिकाणी इराण थेट हल्ला करणार की दहशतवादी हल्ले घडवून आणणार? की ही इराणने आपल्या शत्रू राष्ट्रांना दिलेली फक्त एक धमकी आहे? याचदरम्यान इस्त्रायलने इराणवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. इराणचे अनेक टॉप कंमांडर अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत.

इराणचा मोठा इशारा

आपल्या धमकीमध्ये इराणी सैन्याच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे की, आमच्याकडे तुमची सर्व माहिती आहे. याच आधारावर तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असाल तरी देखील तुम्ही आमच्यापासून सुरक्षीत नाहीत. तसेच आमच्यावर कितीही भीषण हल्ले झाले तरी देखील आम्ही मिसाईल बनवणं सुरूच ठेवलं असल्याची माहिती देखील यावेळी इराणच्या प्रवक्तव्याने म्हटलं आहे.

आखाती देशांवर हल्ले सुरूच 

दरम्यान ज्या -ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकेची सैन्य तळे आहेत, त्या-त्या देशांवर इराणने हल्ले सुरूच ठेवले आहेत.  या हल्ल्यांमध्ये आखाती देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

Follow Us
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत