Navratri 2023 : नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी करा हे उपाय, वर्षभर नाही भसणार आर्थिक तंगी

शारदीय नवरात्रीची महानवमी 23 ऑक्टोबर म्हणजेच आज आहे. नवरात्रीच्या नवव्या दिवशी जो कोणी देवी सिद्धिदात्रीची पूर्ण भक्तिभावाने व विधीपूर्वक पूजा करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे.

Navratri 2023 : नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी करा हे उपाय, वर्षभर नाही भसणार आर्थिक तंगी
देवी सिद्धीदात्री
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 23, 2023 | 9:43 AM

मुंबई : नवरात्रीचा (Navratri 2023) शेवटचा दिवस म्हणजेच नवमी तिथी अत्यंत शुभ मानली जाते. याला दुर्गा नवमी किंवा महानवमी असेही म्हणतात. या दिवशी दुर्गा देवीचे नववे रूप सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. कन्या पूजा करण्याचीही परंपरा आहे. शास्त्रानुसार माता सिद्धिदात्रीच्या अणिमा, महिमा, प्राप्ती, प्राकाम्या, गरिमा, लघिमा, इशित्व आणि वशित्व अशा आठ सिद्धी आहेत. शारदीय नवरात्रीची महानवमी 23 ऑक्टोबर म्हणजेच आज आहे. नवरात्रीच्या नवव्या दिवशी जो कोणी देवी सिद्धिदात्रीची पूर्ण भक्तिभावाने व विधीपूर्वक पूजा करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात असे ज्योतिषशास्त्राचे मत आहे. त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे महानवमीच्या दिवशी केल्यास माता राणी प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करते. चला तर मग जाणून घेऊया त्या उपायांबद्दल.

या उपायांनी वर्षभर राहिल देवीची कृपा

1. जर तुम्ही दीर्घ काळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर महानवमीच्या दिवशी माता दुर्गेची ज्योत आग्नेय कोपर्‍यात लावा. हा उपाय केवळ रोगांपासूनच नाही तर शत्रूपासूनही मुक्त होतो. तसेच महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

2. नवमीच्या दिवशी नऊ कुमारीकांना घरी बोलावून त्यांची पुजा करा आणि त्यांना जेवू घाला. त्यांना वस्त्र भेट द्या. असे केल्याने माता दुर्गा प्रसन्न होते आणि घर सुख-समृद्धीने भरून जाते.

3. आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर नवमीच्या दिवशी देवीच्या मूर्तीला गंगाजलने अभिषेक करावा. यानंतर पूर्ण भक्तिभावाने दुर्गास्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने माता दुर्गा तिला संपत्ती आणि समृद्धीचे आशीर्वाद देते.

4. महानवमीच्या दिवशी माता दुर्गाला पिवळ्या रंगाच्या कवड्या आणि शंख अर्पण करा. या उपायाने माता दुर्गा प्रसन्न होते. माता दुर्गेच्या कृपेने घरात समृद्धी येते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते.

5. नवरात्रीच्या महानवमीच्या दिवशी दुर्गादेवीला लग्नाचे साहित्य अर्पण करावे. असे केल्याने माता दुर्गा प्रसन्न होऊन अखंड सौभाग्याचे वरदान देते.

6. महानवमीच्या दिवशी माता राणीच्या मूर्तीसमोर 9 दिवे लावा. आता दिव्यांसमोर लाल तांदळाचा ढीग करून त्यावर श्रीयंत्र ठेवा. पूजेनंतर घरातील देवघरात त्याची प्रतिष्ठापना करा. असे केल्याने अचानक आर्थिक लाभ होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)