Navratri 2023 : नवरात्रीत जन्मलेल्या मुलीचे दुर्गा देवीच्या स्वरूपावरून ठेवा ट्रेंडी नाव

Navratri 2023 नाव हे प्रत्तयेकाला एक वेगळी ओळख देते. कर्तृत्त्व घडवण्यासाठी आध्यात्मिक शक्तीची साथ आवश्यक असते अशा परिस्थितीत तुम्ही जर देवीच्या स्वरूपाशी संबंधीत नाव मुलीला दिले तर जिवनात सकारात्मकता लाभेल. 

Navratri 2023 : नवरात्रीत जन्मलेल्या मुलीचे दुर्गा देवीच्या स्वरूपावरून ठेवा ट्रेंडी नाव
नामकरण
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 17, 2023 | 8:50 AM

मुंबई : नवरात्र (Navratri 2023) काही दिवसांवर येत आहे. 15 ऑक्‍टोबर 2023 ते 24 ऑक्‍टोबर 2023 पर्यंत भक्त  दुर्गा देवीच्‍या भक्तीत तल्लीन राहतील. देवीच्या भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या दिवसात अनेकांच्या घरी लक्ष्मीचे आगमन कन्येच्या रूपात होते. म्हणजेच या दिवसात घरी मुलीचा जन्म झाला तर अत्यंत शुभ मानल्या जाते. असं म्हणतात की एखाद्याच्या नावाचा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर खूप प्रभाव पडतो. अशा परिस्थितीत तुम्ही नवीन जन्माला आलेल्या मुलीचे नाव माता दुर्गेच्या या नावांवर ठेवू शकता.

देवीच्या स्वरूपावरून ठेवा ट्रेंडी नाव

शैला

माता दुर्गेच्या नवीन रूपांपैकी एकाचे नाव शैलपुत्री आहे. यासारखेच एक नाव आहे शैला. शैला म्हणजे डोंगरात राहणारी. हे नाव खूप आधुनिक वाटतं.

ईशा

दुर्गा मातेचे नावही ईशा आहे. ईशा म्हणजे रक्षक. मुकेश अंबानी आणि बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र यांनी त्यांच्या मुलीचे नाव ईशा ठेवले आहे. ईशा नावाच्या मुली खूप प्रगती करतात.

शांभवी

आई पार्वतीचे नाव शांभवी आहे. या नावाचा अर्थ भगवान शिवाची पत्नी आहे. शांभवी नावाच्या मुली माता पार्वती सारख्या शांत आणि सुंदर स्वभावाच्या असतात.

शरण्य

माता दुर्गेचे हे नाव तुमच्या मुलीसाठी देखील खूप चांगले असू शकते. शरण्य म्हणजे आश्रय देणारी. या नामामुळे मुलींमध्ये प्रेमळ स्वभाव वाढतो.

स्तुती

स्तुती हे दुर्गेचे नाव देखील आहे. स्तुती नावाच्या मुलींना त्यांच्या आयुष्यात खूप प्रशंसा मिळते आणि त्यांची प्रगती देखील लवकर होते.

भार्गवी

हे देखील दुर्गा देवीचे एक नाव आहे. भार्गवी म्हणजे सुंदर किंवा मोहक. हे नाव कोणत्याही मुलीला शोभेल.

तन्वी

तन्वी म्हणजे सुंदर. आपल्या मुलीचे नाव दुर्गा देवीच्या स्वरूपावरून ठेवण्याचा हा एक चांगला पर्याय आहे.

अन्विथा

हे नाव देखील आई दुर्गेच्या नऊ रूपांवर आधारित आहे. तसेच, हे खूप वेगळे आणि ट्रेंडी नाव आहे. याचा अर्थ प्रतिभावान किंवा शक्तिशाली असा होतो.

नाव हे प्रत्तयेकाला एक वेगळी ओळख देते. कर्तृत्त्व घडवण्यासाठी आध्यात्मिक शक्तीची साथ आवश्यक असते अशा परिस्थितीत तुम्ही जर देवीच्या स्वरूपाशी संबंधीत नाव मुलीला दिले तर जिवनात सकारात्मकता लाभेल.