
वास्तुशास्त्रात अनक गोष्टींचे नियम सांगण्यात आलं आहे. घरातील प्रत्येक कोपरा असो किंवा दिशा असो प्रत्येकाबद्दल काहीना काही नियम हे संगितले आहेत. त्यातीलच एक म्हणजे झोपताना काही गोष्टी स्वत:जवळ किंवा आपल्या आसपास ठेवू नये. अन्यथा त्याचे परिणाम हे आयुष्यावर होऊ शकतात. वास्तुची काही तत्वे योग्यरित्या समजून घेतली आणि त्यांच्या आयुष्यात अंमलात आणली तर जीवन सोपे होऊ शकते.
ज्या लोकांचे घरात सतत वाद होत असतात, शांतता नसते. त्यांनी एकदा तरी वास्तुशी संबंधित उपाय नक्कीच करून पहावेत. त्यातील एक महत्त्वाची जागा म्हणजे बेडरूम.ही वास्तु प्रथम योग्य असावी कारण आपण आपला बहुतेक वेळ तिथेच घालवतो. वास्तुनुसार, झोपताना चुकूनही काही गोष्टी बेडरूममध्ये ठेवू नयेत. अन्यथा त्याचे विपरित परिणाम आयुष्यावर होऊ शकतात.
या वस्तू झोपताना आपल्या जवळ ठेवू नयेत
घड्याळ
वास्तुशास्त्रानुसार, झोपताना तुमच्या पलंगाजवळ घड्याळ असू नये. त्याची ऊर्जा मानसिक ताण वाढवू शकते. ते तुमच्या झोपण्याच्या जागेपासून थोडे दूर ठेवणे चांगले.
पाकीट/पर्स
लोक अनेकदा त्यांचे पाकीट बेडजवळच्या ड्रॉवरमध्ये ठेवतात, जे योग्य नाही. कोणीही कधीही त्यांचे पाकीट बेडजवळ ठेवू नये. असे केल्याने देवी लक्ष्मी निराश होते आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. शास्त्रांनुसार, यामुळे भविष्यात आर्थिक अडचणी येऊ शकतात.
इलेक्ट्रॉनिक वस्तू
झोपताना बेडजवळ कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नयेत. लॅपटॉप आणि मोबाईल फोन कधीही बेडवर किंवा बेडजवळ ठेवू नयेत. रेडिएशनमुळे हे आरोग्यासाठी आणखी हानिकारक आहे. म्हणून, या वस्तू बेडपासून दूर ठेवणे चांगले.
पादत्राणे
वास्तुशास्त्रानुसार, शूज आणि चप्पल कधीही बेडरूममध्ये ठेवू नयेत. यामुळे घाण खोलीत येते आणि त्यामुळे नकारात्मकता देखील येते. झोपताना, खोलीत किंवा बेडजवळ कोणतेही शूज, चप्पल ठेवू नयेत.
पुस्तके/डायरी
झोपताना जवळ पुस्तके आणि डायरी देखील बेडवर ठेवू नयेत. पुस्तके आणि डायरी म्हणजे देवी सरस्वतीचा वास असतो. म्हणून, त्या बेडजवळ ठेवू नयेत. लोक झोपण्यापूर्वी अनेकदा पुस्तके वाचतात किंवा जर्नलमध्ये लिहितात, आणि ते तसेच ठेवून झोपताना. जे पूर्णपणे चुकीचे आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)