AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिवर डिटॉक्सिफाय करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी गाजराच्या ज्यूसमध्ये मिक्स करून प्या ‘हे’ तीन पदार्थ

लिवर आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. अशातच तुम्हाला तुमचे लिव्हर निरोगी ठेवायचे असेल तर सकाळी रिकाम्या पोटी हे आरोग्यदायी पेय प्या.

लिवर डिटॉक्सिफाय करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी गाजराच्या ज्यूसमध्ये मिक्स करून प्या 'हे' तीन पदार्थ
carrot juiceImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Mar 10, 2026 | 3:17 PM
Share

निरोगी शरीर राखण्यात लिवर महत्त्वाची भूमिका बजावते. हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे जो 50 हून अधिक कार्ये करतो. हार्मोनचे उत्पादन असो किंवा प्रथिने संश्लेषण असो लिवरशिवाय शरीर अनेक कार्ये करू शकत नाही. मात्र आजच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे लिवरवर अनेकदा भार पडतो. जी लोकं अल्कोहोल आणि जास्त प्रथिने घेतात यामुळे याचा लिवर भार वाढतो आणि लिवरच्या कार्यावर परिणाम होण्यास सुरूवात होते. परंतु आयुर्वेदाात लिवरचे कार्य सुधारण्याचे अनेक मार्ग सांगितले आहे. फॅटी लिवर ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला त्यांच्या आहारामुळे फॅटी लिवरची समस्या भेडसावते परंतु आयुर्वेद काही पद्धती सांगतो ज्या लिवरला विषमुक्त करण्यास आणि निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.

लिवर विषमुक्त करण्यासाठी गाजराचा ज्यूस कसा बनवायचा?

गाजर, सफरचंद, द्राक्ष आणि पुदिना एकत्र करून ज्यूस बनवा. तर हा ज्यूस बनवताना यात साखर किंवा मीठ मिक्स करू नका आणि सकाळी रिकाम्या पोटी या ज्यूसचे सेवन करा. हा ज्यूस केवळ फॅटी लिवरसाठीच नाही तर कावीळसाठी देखील फायदेशीर आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने अनेक फायदे मिळू शकतात.

1. गाजर-

गाजर लिवरच्या पेशींना बळकटी देतात आणि त्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. तसेच गाजरामधील घटक लिवरवरील अधिकचा दबाव देखील कमी करतात.

2. सफरचंद-

सफरचंदातील गुणधर्म लिवरची जळजळ कमी करण्यास मदत करतात आणि पेशींच्या पुनरुत्पादनात देखील मदत करतात.

3. द्राक्ष-

द्राक्ष हे असं एक फळ आहे जे लिवरमधील एंजाइम वाढवते, जे प्रथिनांचे पचन आणि संश्लेषण करण्यास मदत करते.

4. पुदिना

पुदिना केवळ या ज्यूसची चव वाढवत नाही तर लिवरमधील निर्माण होणाऱ्या समस्या कमी करण्यास देखील मदत करतो. एकंदरीत हा ज्यूस लिवरला ताजेतवाने करेल आणि त्याचे कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा प्रदान करतात.

लिवर निरोगी ठेवण्यासाठी काय खावे?

लिवरच्या चांगल्या आरोग्यासाठी तुमच्या आहारात भरपूर हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. हिरव्या पालेभाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि क्लोरोफिल भरपूर प्रमाणात असते, जे लिवरला विषमुक्त करण्यास मदत करते. तसेच सूर्यास्तानंतर खाणे टाळा. जर तुम्हाला भूक लागली असेल तर खिचडी किंवा सूपसारखे हलके जेवण सेवन करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर...
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?