Maharashtra News LIVE : कल्याणचे अशोकनगर पुन्हा जलमय होण्याची भीती, आंदोलनाचा इशारा
Maharashtra News LIVE Updates: भरत गोगावले यांना रायगडच्या पालक मंत्री पदाची लॉटरी

LIVE NEWS & UPDATES
-
भांडुपमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात
भांडुपमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाने भांडुपकर सुखावले आहेत. मुंबईच्या अनेक भागात आज सकाळी चांगला पाऊस झाला आहे. मुंबईत आता उकाड्यात कमतरता आली असून हवा थोडी गार झाली आहे. गेले अनेक दिवस मुंबईचे रात्रीचे तापमानही ३२ डिग्रीच्या पुढे गेले होते.
-
कल्याणचे अशोकनगर पुन्हा जलमय होण्याची भीती, आंदोलनाचा इशारा
वालधुनी नदी गाळ आणि कचऱ्याने तुडुंब भरल्याने कल्याणचे अशोकनगर पुन्हा जलमय होण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्यांकडे पालिका प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याने आता रहिवाशांच्या घरात पाणी शिरले आणि नागरिकांना पुन्हा त्रास झाला तर नदीतील गाळ अधिकाऱ्यांच्या दालनात टाकू असा इशारा संतप्त नगरसेविकेने केडीएमसी प्रशासनाला दिला आहे.
-
-
…तर शिवसेनेचा हिसका दाखवला असता – शंभुराज देसाई
मी स्वत: कॉमर्सचा स्टुडन्ट आहे. जयकुमार गोरे काय बोलले ते मी ऐकलेलं नाही, पण बोलले असतील तर आम्ही गाफिल नाही असे मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे. कुणी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करू शकत नाही जर आधीच माहिती असती तर शिवसेनेचा हिसका दाखवला असता. मतांचा हिशोब आम्हालाही ठेवता येतो असेही मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे.
-
भरत गोगावले यांना रायगडच्या पालक मंत्री पदाची लॉटरी
भरत गोगावले यांची पालकमंत्री पदी वर्णी लागणार असल्याची माहिती स्वत: भरत गोगावले यांनीच दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात राष्ट्रवादी पक्षाचे खासदार सुनिल तटकरे यांच्याशी बातचित केली आहे.
-
राजधानी नवी दिल्लीत पावसाला सुरुवात
राजधानी नवी दिल्लीत पावसाला सुरुवात झाली आहे. दिल्लीच्या विविध भागात हलक्या सरी कोसळल्या. पावसामुळे वातावरणात हलकेपणा जाणवायला सुरुवात झाली आहे. मागच्या काही दिवसापासून सुरू असलेल्या उकाड्यापासून दिल्लीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
-
-
सातारा : ग्रामीण भागात पावसाचे आगमन
सातारा जिल्ह्यात पावसाचे मागील दोन दिवसापासून आगमन झाले असून आज सकाळपासूनच पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. हा पाऊस शेतीच्या मशागतीसाठी उपयुक्त समजला जात असून पूर्वेकडील मान खटाव परिसरात पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.
-
शिरूर/पुणे : कासारी गावात तीव्र पाणीटंचाई; नागरिकांचा हंडा मोर्चा
शिरूर तालुक्यातील कासारी गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने संतप्त महिलांसह ग्रामस्थांनी हंडा मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. गेल्या अनेक दिवसांपासून गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असून, नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. महिलांनी डोक्यावर रिकामे हंडे घेऊन मोर्चा काढत ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करावा आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.
-
-
वाशिमच्या मानोरा-मंगरुळपीर तालुक्यात पावसाच्या सरी
वाशिम जिल्ह्यातील मानोरा-मंगरुळपीर तालुक्यात अनेक ठिकाणी आज मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे संत्रा बागांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी मृग बहारासाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.
-
मुंबईसह महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा
हवामान विभागाने मुंबई, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये पुढील 3 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
-
अयोध्या: देणगी चोरी प्रकरणी एसआयटीचा अहवाल सादर
उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिरासाठीच्या अर्पण निधीतील कथित अपहार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या तीन सदस्यीय विशेष तपास पथकाने (एसआयटी) आपला अहवाल उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) संजय प्रसाद यांना सादर केला आहे.
-
विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदार गोकुळ गीते यांनी घेतली शपथ
विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार गोकुल गीते यांनी शपथ घेतली. राजेंद्र दराडे यांचा पराभव करून त्यांनी विजय मिळवला आहे. निवडून आल्यानंतर बराच गदारोळ माजला होता. सोमवारी ते उदय सामंत यांच्यासोबत मुंबईत आले होते.
-
विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी
विधानपरिषदेत नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होत आहे. आमदार रविंद्र फाटक, राजेंद्र राऊत, अरूण लखानी, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी यांनी शपथ घेतली.
-
मान्सूनचा विस्तार वाढला
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) आज मुंबईत मान्सूनच्या आगमनाची घोषणा केली आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, आज नैऋत्य मान्सूनने मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये, मुंबईसह महाराष्ट्राच्या काही अधिक भागांमध्ये, तेलंगणा आणि ओडिशाच्या उर्वरित भागांमध्ये, तसेच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या काही अधिक भागांमध्ये प्रवेश केला आहे.
-
समृद्धी महामार्गावर अपघात! धावत्या ट्रकला फॉर्च्युनर गाडीची धडक
समृद्धी महामार्गावर दुसरबीड जवळ आज सकाळी अपघात होऊन दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर जालना येथे उपचार सुरू आहेत. डॉक्टर सय्यद आसिफ सय्यद उमर हे आपल्या पत्नी गुलसीतान बी आणि कुटुंबासह नागपूरवरून संभाजीनगरचे दिशेने जात होते. मात्र समोर धावणाऱ्या ट्रकला त्यांच्या चार चाकी वाहनाने धडक दिली.
-
शेतकऱ्यांच्या मागण्यासाठीचा काँग्रेसच्या आसूड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी नांदेड काँग्रेस जिल्हा कमिटीच्या वतीने आज काँग्रेस जिल्हा कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय अश्या आसूड मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला सुरुवात झाली असून या मोर्चामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह पदाधिकरी, कार्यकर्ते हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चामध्ये शेकडो बैलगाड्या ट्रॅक्टरचा ही समावेश आहे.
-
ओमराजे निंबाळकर, प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक सुरू
ओमराजे निंबाळकर प्रताप सरनाईक यांच्या दालनात आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहातून प्रताप सरनाईक यांच्या दालनात दाखल झाले आहेत. ओमराजे निंबाळकर प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे यांच्यात बैठक सुरू आहे.
-
नाशिकमध्ये गोकुळ गीते यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी
नाशिकमध्ये गोकुळ गीते यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी… बॅनरवर ज्यांनी आमचा बाप काढला आम्ही त्यांचा बाप पाडला असा आशय…
-
भोंदू अशोक खरातविरुद्धच्या खटल्याला आजपासून सुरुवात
भोंदू अशोक खरातविरुद्धच्या खटल्याला आजपासून सुरुवात… नाशिकमध्ये नोंद असलेल्या अत्याचारांच्या गुन्ह्याच्या खटल्याला आज सुरुवात होणार… नाशिक सत्र न्यायालयात सुनावणी होणार… उज्ज्वल निकम यांची सरकारकडून नियुक्ती…
-
फुटीर 6 खासदारांना दिल्ली पोलिसांचं संरक्षण
फुटीर 6 खासदारांना दिल्ली पोलिसांचं संरक्षण. दिल्लीतील संपूर्ण इमारतीबाहेर दिल्ली पोलिसांची सुरक्षा. खासदारांच्या निवासात जाण्यासाठी पोलीस परवानगी आवश्यक.
-
बीडच्या माजलगावमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणावर चाकू आणि लोखंडी रॉडनं जीवघेणा हल्ला
बीडच्या माजलगावमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणावर चाकू आणि लोखंडी रॉडनं जीवघेणा हल्ला… तरुणाच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत… तरुणावर झालेल्या हल्ल्याचा CCTV व्हायरल…
-
आंबेगाव तालुक्यातील वडगावपीर येथे झाडावर वीज कोसळली
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वडगावपीर येथे वीज कोसळल्याची घटना घडली आहे. विजेच्या प्रचंड तडाख्यामुळे एका मोठ्या झाडाला आग लागली आहे आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांची धावपळ सुरू असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आंबेगाव तालुक्यात सुरू असलेल्या पावसाळी वातावरणात वडगावपीर परिसरात अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी एका झाडावर वीज कोसळली. विजेच्या तडाख्यानंतर झाडाने पेट घेतला आणि काही वेळातच झाडाचा मोठी आग लागली सुदैवाने झाडाजवळ कोणतीही व्यक्ती नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
-
धाराशिव शिवसेनेत खांदेपालट
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेत खांदेपालट होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेची कार्यकारिणी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसर बरखास्त करण्यात आली आहे. तर लवकरच पक्ष पुनर्बांधणी करून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत
-
शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेना
शिंदखेडा साखळी शिरपूर परिसरामध्ये काही प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. पेरणीसाठी बैल खरेदी साठी बैल बाजारात शेतकऱ्यांची गर्दी दिसून आली. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैलांच्या किमतीमध्ये वाढ झाली. पस्तीस ते चाळीस हजार रुपये किमतीची बैलजोडी 60 ते 65 हजार रुपयांना मिळत आहे.
-
ऑपरेशन टायगर यशस्वी- मंत्री संजय शिरसाट
एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर सुरू केले होते ते सक्सेस केले अनेकांनी काम करण्याची आधी इच्छा व्यक्त केली होती.उद्या जर काही मिळाले तर केंद्रात काही मंत्री पद मिळाले तर याचा निर्णय एकनाथ शिंदे घेणार आहेत. पक्ष मजबुती चा विचार करून निर्णय घेतला आहे, असे मंत्री संजय शिरसाट म्हणाले. मुळांमध्ये शिवसेना प्रमुख यांच्या वक्तव्याविषयी बोलणे चुकीचे आहे. ते आमच्या आदरणीय आहे. स्वाभिमान आणि अभिमान असून त्यांच्या बद्दल वक्तव्य केल्याने समर्थन नाही, असे किरण पावसकर यांच्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
-
युवासेनेकडून रास्ता रोको आंदोलन
कल्याण नगर मार्गावर ठाकरे गटाच्या -युवासेनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. ठाकरे गटातून फुटलेले खासदार शिंदे गटात प्रवेशानंतर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी सहा खासदारांचे पुतळे बनवून चपलीने मारत भर चौकात पुतळे पेटवत केला रास्ता रोको केला. कल्याण ग्रामीण जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर आणि युवासेना जिल्हाप्रमुख भूषण जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले.
-
राज्यात एंटी नार्किटिस्टची मोहीम- मुख्यमंत्री
ड्रग्स बाबत आपण नेहमी या सभागृहात चर्चा करतो. ज्या ज्या ठिकाणी ड्रग्स विकला जातो त्याची माहिती पोलिसांना दिली तरी कारवाई होत नाही. आज गल्लीबोळात ड्रग्स विक्री केली जातेय, असा आरोप सुनील प्रभू यांनी केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. आज राज्यासमोर महत्वाचे आव्हान उभे राहिले आहे. आपण एंटी नार्किटिस्टची मोहीम हाती घेतलीय, असे मुख्यमंत्री म्हणाले.
-
जळगाव जिल्ह्यात पावसाचं आगमन
जळगाव जिल्ह्यात पावसाचं आगमन झालं. जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडला. मात्र उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाला देखील सुखद धक्का.
-
कल्याण नगर मार्गावर ठाकरे गटाच्या -युवासेनेकडून रास्ता रोको आंदोलन
कल्याण नगर मार्गावर ठाकरे गटाच्या -युवासेनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. ठाकरे गटातून फुटलेल्या खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
सहा खासदारांचे पुतळे बनवून चपलीने मारत भर चौकात कार्यकर्त्यांकडून पुतळे पेटवत रास्ता रोको केला . कल्याण ग्रामीण जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर आणि युवासेना जिल्हाप्रमुख भूषण जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. टिटवाळा येथील गोवली पोलीस चौकीसमोर आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.
-
राज ठाकरेंनी बोलावली मनसेच्या नगरसेवक आणि नेत्यांची बैठक
राज ठाकरेंनी मनसेच्या नगरसेवक आणि नेत्यांची बैठक बोलावली . शिवतीर्थ निवासस्थानी बैठक होणार असून राज ठाकरे नगरसेवकांसोबत संवाद साधणार आहेत. मुंबई महानगरपालिका आणि संघटनात्मक विषया संदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे. संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार बैठकीसाठी दाखल झाले आहेत.
-
लासलगाव – एल निनोचा प्रभावामुळे जूनअखेरीसही दमदार मान्सूनची प्रतीक्षा…
लासलगाव (नाशिक) : एल निनोच्या प्रभावामुळे जूनअखेरीसही दमदार मान्सूनची प्रतीक्षा आहे. नाशिक जिल्ह्यातील मेथी, मिरची, टोमॅटो पिकांवर पाण्याअभावी संकट कोसळलं आहे. पावसाअभावी भूजल पातळीत घट झाल्याने अनेक विहिरी कोरड्या पडल्या असून – कमी पाण्यावर पिके जगविण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
-
कल्याणच्या संतोषी माता रोडवर झाडाची मोठी फांदी कोसळली; वाहतूक कोंडी
कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रोडवर झाडाची मोठी फांदी अचानक कोसळली. सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसादरम्यान ही घटना घडली. झाडाची मोठी फांदी रस्त्यावर पडल्याने वाहतुक कोंडी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. फांदी हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वाहतूक पोलिस देखील घटनास्थळी पोहोचून वाहतूक नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
-
शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा,आभाळाकडे लागले डोळे
संपूर्ण जून महिना सरत चालला तरी देखील जालना जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नसल्यामुळे सध्या शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत सापडले आहे, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस येईल या असे पोटी अनेक शेतकऱ्यांनी कोरडवाहू मध्ये कपाशी सह इतर पिकांची लागवड केली होती मात्र पाऊस नसल्याने ही पिके धोक्यात आली परिणामी ही पिके वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरू आहे. तुषार सिंचन च्या माध्यमातून रोज तासभर पाणी देऊन ही पिके जगण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र बदनापूर तालुक्यातल्या अकोला गावात पाहायला मिळत आहे. त्यामुळे अजूनही शेतकरी बांधवांना दमदार पावसाची प्रतीक्षा असून त्यांचे डोळे आता आभाळाकडे लागले आहे.
-
कल्याण-डोंबिवलीत रिमझिम पावसाची हजेरी; उकाड्यापासून दिलासा, काही भागांत बत्ती गुल
कल्याण-डोंबिवलीत सकाळपासून ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाची सुरुवात झाली आहे. उशिराने दाखल झालेल्या पावसामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अनेक नागरिक आणि लहान मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला. काल सायंकाळपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला असून दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
-
अर्धापूरला गद्दारांच्या गाड्या शिवसैनिकांनी अडवल्या – संजय राऊत
अर्धापूरला गद्दारांच्या गाड्या शिवसैनिकांनी अडवल्या… 3 गद्दार आणि 850 पोलीस होते.. एवढे पोलीस कामाला लावले, आम्ही काय बॉम्ब टाकणार होतो?.. असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.
-
शिंदेंचं पालनपोषण मातोश्रीच्या पाळणाघरात झालंय – संजय राऊत
किरण पावसकरांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा पलटवार… शिंदेंचं पालनपोषण मातोश्रीच्या पाळणाघरात झालंय. तुम्ही ठेकेदारांची पाळणाघरं सांभाळताय… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
ठेकेदारीत कमिशन मिळणं हा फुटलेल्या खासदारांचा मानसन्मान – संजय राऊत
फुटीरांनी 50 – 75 कोटी रुपये घेतले, हाच त्यांचा मानसन्मान… ठेकेदारीत कमिशन मिळणं हा फुटलेल्या खासदारांचा मानसन्मान… काल एक पोपटानं बाळासाहेब ठाकरेंची खिल्ली उडवली… मिंधे गटानं बाळासाहेबांच्या वाक्याची खिल्ली उडवली.. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
मुख्यमंत्र्यांची दांडीबहाद्दर मंत्र्यांना तंबी..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दांडीबहाद्दर मंत्र्यांना मोठी तंबी दिली आहे. राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू झाले. यादरम्यानच त्यांनी मंत्र्यांना थेट म्हटले की, सभागृह हजेरी पाहिजे, कामकाज तहकूब झाले तर खपवून घेणार नाही.
-
मुंबईमध्ये जोरदार पावसाला सुरूवात
मुंबई उपनगरात मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, गोरेगाव, दहिसर या संपूर्ण पट्ट्यात पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच काळे ढग दाटून आले.
-
संतोष देशमुख खून प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज सुनावणी
दिवंगत सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज पुन्हा सुनावणी. एका महिन्यात तिसरी सुनावणी, सुनावणी गती मिळाली. आरोपी जयराम चाटे याच्या जामीन अर्जावर आज युक्तिवाद होणार. तर आरोपींनी केलेल्या विविध अर्जांवर निर्णय येण्याची शक्यता.
-
उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी दाखवली अस्वच्छता…
माझ्या स्वतःच्या घरी घाणेरडे पाणी आलं, दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचं उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी म्हटल असून नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे. अमळनेर मधील जीवनज्योती कॉलनी परिसरातील जलकुंभांमध्ये उतरून उपनगराध्यक्ष प्रशांत निकम पाहणी करत टाकीत मोठ्या प्रमाणावर गाळ व घाण साचल्याचे वास्तव्य दाखवलं. 22 वर्षात एकदाही अमळनेर शहरातील जलकुंभाची स्वच्छता करण्यात आली नसल्याचा सवाल देखील उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी उपस्थित केले
-
शिंदेंच्या शिवसेनेचे मुंबईत उभं राहणार नवीन “सेनाभवन” ?
नवीन “सेनाभवना”साठी शिंदेंच्या शिवसेनेकडून जागांची शोधाशोध सुरू असल्याची सूत्रांची माहिती. या नवीन “सेनाभवना”साठी दोन जागाही शिंदे सेनेच्या नेत्यांनी पाहिल्याचे कळते. यातील एक जागा ही वांद्रे बीकेसीतील असून ही जागा ठाकरेंच्या ‘मातोश्री’हून अगदी काही अंतरावर असल्याचे कळते तर दुसरी जागा ही दादरमध्ये पाहण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेना शिंदेगटाकडून आता राज्यभरात शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात असताना. पक्षासाठी आता “मुख्यालय” असणे गरजेचे आहे. यासाठी शिवसेना भवनाच्या धर्तीवर शिॅदेंच्या शिवसेनेकडून नव्या सेनाभवनासाठी जागांची पाहणी सुरू केली आहे.
-
नाशिकमध्ये पावसाचा आज यलो अलर्ट
नाशिकमध्ये पावसाचा आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल शहरातील काही परिसरात तुरळक पाऊस झाला. पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तर ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उकाड्यात वाढ झाली आहे.
-
गोकुळ गीते यांच्या विजयानंतर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी
गोकुळ गीते यांच्या विजयानंतर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनरवर ‘ज्यांनी आमचा बाप काढला, आम्ही त्यांचा बाप पाडला’ असा आशय आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या वडिलांबाबत वक्तव्य केल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता. निवडणुकीतील विजयानंतर गोकुळ गीते यांचे बॅनर चर्चेत आले आहेत.
-
नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात याच्याविरुद्ध खटल्याला आजपासून सुरुवात
नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात याच्याविरुद्ध खटल्याला आजपासून सुरुवात होणार आहे. नाशिक शहरात नोंद असलेल्या अत्याचारांच्या गुन्ह्याच्या खटल्याला सुरुवात होणार आहे. नाशिक सत्र न्यायालयात ही सुनावणी होणार असून सरकारने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. उज्ज्वल निकम यांच्यासोबतच अहिल्यानगरचे वकील परिमल फळे यांची सहायक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खरात प्रकरणात 20 मार्चपासून 11 गुन्ह्यांचा एसआयटीमार्फत तपास सुरू आहे.
-
नागपुरात चौदा वर्षीय मुलीचा बालविवाह प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप करून रोखला
नागपुरात जयताळा परिसरात सुरू असलेला चौदा वर्षीय मुलीचा बालविवाह प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप करून रोखला. चाइल्डलाइनच्या हेल्पलाइनवर मिळालेल्या माहितीमुळे कारवाई झाली. हळदीचा कार्यक्रम पार पडला होता, तर लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात होती. महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्डलाइन आणि प्रतापनगर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. कागदपत्रांच्या पडताळणीत मुलगी अल्पवयीन असल्याचं स्पष्ट झालं. समुपदेशनानंतर दोन्ही कुटुंबांनी विवाह थांबविण्यास सहमती दर्शविली.
-
नागपूरच्या न्यूरॉन रुग्णालयात डॉ. ईश्वरचंद्र चांदेवार यांचा संशयास्पद मृत्यू
नागपूरच्या प्रसिद्ध न्यूरॉन रुग्णालयात डॉ. ईश्वरचंद्र चांदेवार यांचा त्यांच्या कक्षातच संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. मृत डॉक्टरच्या कक्षात काही इंजेक्शन आढळल्याने इंजेक्शनचा ओव्हरडोज झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. डॉ. चांदेकर आयुर्वेदिक डॉक्टर होते आणि ते न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. काल सकाळी त्यांनी रुग्णालयातील नियमित कामं आटोपल्यानंतर त्यांच्या कक्षात विश्रांतीसाठी गेले. बराच वेळ त्यांनी दार न उघडल्यामुळे सहकाऱ्यांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी दार उघडल्यावर डॉ. चांदेवार बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांची तपासणी केल्यावर त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.
-
मातोश्रीबाहेर मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे बॅनर
मातोश्रीबाहेर मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर हिंदू गब्बरचा उल्लेख करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांना डिवचणारे हे बॅनर लागले आहेत. मयूर बागोरिया यांच्या वतीने हे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरमध्ये भाजपच्या अनेक नेत्यांचे फोटो दिसत आहेत.
-
मुंबईत पावसाची दमदार हजेरी
मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली असून ढगाळ वातावरणानंतर सरी बरसल्या आहेत. यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. काळ्या ढगांच्या गर्दीनंतर दादरमध्ये पावसाचं आगमन झालं आहे. मुंबईतील अनेक भागात पावसाच्या सरी बरसत आहेत.
-
ओमराजे निंबाळकरांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर धाराशिव जिल्ह्यात ठाकरे शिवसेनेची पुनर्बांधणी
धाराशिव जिल्ह्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरे शिवसेनेच्या संघटनात्मक पुनर्बांधणीला वेग आला आहे. येत्या 26 जून रोजी उद्धव ठाकरे यांचा धाराशिव दौरा नियोजित असून त्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकींचं आयोजन करण्यात आलं आहे.
विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या 17 पैकी 16 जागा जिंकून महायुतीने मोठं यश संपादन केलं. महाविकास आघाडीला भोपळाही फोडता आला नाही. नाशिकमध्ये मात्र भाजप बंडखोराने शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव केल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का बसला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेवकांंनी विरोधात मतदान केल्यानेच शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. अपेक्षेप्रमाणे महायुतीने घवघवीत यश मिळवलं असलं तरी नाशिकच्या निकालाने महायुतीतील संघर्ष समोर आला आहे. तर दुसरीकडे नाशिकच्या भोंदू अशोक खरात याच्याविरुद्ध खटल्याला आजपासून सुरुवात होणार आहे. नाशिक शहरात नोंद असलेल्या अत्याचारांच्या गुन्ह्याच्या खटल्याला सुरुवात होणार आहे. नाशिक सत्र न्यायालयात ही सुनावणी होणार असून सरकारने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. यासह देश-विदेशातील, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Jun 23,2026 8:12 AM
