AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ तक्रारीचं तथ्य काय? निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; SIR, Form 6 आणि महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय

ECI Meeting News: भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन निवडणूक आयुक्तांनी एकमताने अनेक निर्णय घेतले आहेत.

'त्या' तक्रारीचं तथ्य काय? निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; SIR, Form 6 आणि महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय
| Updated on: Sep 26, 2026 | 6:39 PM
Share

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्याभोवती सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आज एक मोठी बैठक घेतली आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीला आयोगाचे तीन निवडणूक आयुक्त सीईसी ज्ञानेश कुमार, डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी उपस्थित होते. यात त्यांनी अनेक खुलासे केले आहे. तसेच निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. फॉर्म ६ बाबतचा वाद हा एक महत्त्वाचा मुद्दा नाही, असे आयोगाकडून निश्चित करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयानेही फॉर्म ६ च्या घोषणेला मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, कॅबिनेट सचिवांना लिहिलेले पत्र आयोगाच्या किंवा आयकर विभागाच्या कोणत्याही धोरणात्मक बाबीशी संबंधित नव्हते. तर ते निवडणूक आयोगात प्रतिनियुक्तीवर असलेल्या एका अधिकाऱ्याच्या कामकाजाशी संबंधित होते. दोन आयुक्तांच्या आदेशानंतर संबंधित अधिकाऱ्याने जारी केलेले कामाच्या पुनर्वितरणाचे आदेश प्रत्यक्षात लागू झाले नाहीत आणि डीईसीद्वारे आयकर विभागावरील देखरेख कधीच काढून घेण्यात आली नाही.

मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही निवडणूक आयुक्त यांच्या बैठकीनंतर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. निवडणूक आयोग म्हणालं की, बिहार आणि पश्चिम बंगालसह २० राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये SIR प्रक्रिया पूर्ण झाली आहे. SIR दरम्यान किंवा त्यानंतर ज्या व्यक्तीचे नाव वगळले गेले आहे. तरुण/प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांसह कोणतीही व्यक्ती, सतत अद्ययावतीकरण प्रक्रियेअंतर्गत मतदार यादीत आपल्या नावाचा समावेश करण्यासाठी संबंधितांकडे अर्ज करू शकते. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या विनंतीनुसार, दावे आणि आक्षेप दाखल करण्याचा कालावधी आयोगाने ३० ऑक्टोबर, २०२६ पर्यंत वाढवला आहे.

दिल्लीत नोटिसा आणि दावे तसेच आक्षेपांच्या निपटाराचा कालावधी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या विनंतीनुसार महाराष्ट्रात दावे आणि आक्षेप दाखल करण्याचा कालावधी आयोगाने १२ ऑक्टोबर, २०२६ पर्यंत वाढवला. महाराष्ट्रात नोटिसा आणि दावे आणि आक्षेपांच्या निपराधाचा कालावधी १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आला आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून परिपत्रक काढून ही माहिती देण्यात आली आहे.

Follow Us
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!