AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या महिलेच्या हातून उपोषण सोडलं आता तिचेच मनोज जरांगेंवर गंभीर आरोप, मोठी खळबळ, थेट म्हणाल्या..

मोठी बातमी समोर येत आहे. मराठा समाजाच्या आरक्षण मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं होतं. ते मुंबईच्या दिशेनं देखील निघाले होते. मात्र त्यांनी वाटेतच आपलं उपोषण सोडलं. दरम्यान त्यानंतर एका महिलेकडून मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

ज्या महिलेच्या हातून उपोषण सोडलं आता तिचेच मनोज जरांगेंवर गंभीर आरोप, मोठी खळबळ, थेट म्हणाल्या..
मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 26, 2026 | 7:14 PM
Share

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. त्यानंतर आपण मुंबईला जाणार असल्याची घोषणा देखील त्यांच्याकडून करण्यात आली. मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं निघाले देखील, परंतु त्यांनी मुंबईच्या वाटेवर असतानाच मध्येच आपलं उपोषण स्थगित केलं. त्यांनी आपल्या मागण्या माण्य करण्यासाठी सरकारला आता तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. परंतु त्यानंतर आता अंतरवाली सराटीमध्ये घडामोडींना वेग आला आहे. अंतरवाली सराटीमधील ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी मोठा निर्णय घेतला आहे. अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा मंडप हटवण्यात आला आहे. तसचे उपोषणासाठी तयार करण्यात आलेलं व्यासपीठ देखील हटवण्यात आलं आहे.

दरम्यान एकीकडे हे सर्व सुरू असतानाच आता दुसरीकडे एका महिलेकडून मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ललिता तारख असं या महिलेचं नाव आहे. ललिता तारख या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात देखील सक्रिय होत्या. मात्र त्यांनी आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाल्या ललिता तारख?

मनोज जरांगे यांनी आमच्या गावाला खोटं आश्वासन देऊन माता माऊल्यांना फसवले. तुमच्या उपोषणाची मी साक्षीदार आहे, तुम्ही कसे उपोषण केलं हे मी वेळ आल्यावर सांगेन. जरांगे यांनी भावनिक करून महिलांचा वापर केला. मनोज जरांगे यांचे चौथे उपोषण मी सोडले. रात्रंदिवस आम्ही आंदोलनासाठी झटत होतो.  अंतरवाली सराटीमध्ये एक देखील कुणबी सर्टिफिकेट मिळाले नाही, हैदराबाद गॅझेटमधून आम्ही दहा महिन्यांपूर्वी अर्ज केला आहे. जरांगे यांनी आमच्या गावाला खोटं आश्वासन देऊन माता माऊल्यांना फसवले, असे आरोप ललिता तारख यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केले आहेत.

दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, अंतरवाली सराटीमध्ये एकही कुणबी नोंद सापडलेली नाहीये, मनोज जरांगे यांनी हैदराबाद गॅझेटीयरनुसार आरक्षण भेटेल असं आश्वासन आम्हाला दिलं होतं. यापूर्वी आम्ही मंडप काढू नये म्हणून पोलिसांना विरोध केला होता. उपोषण केल्यावर माणूस दोन दिवस देखील राहू शकत नाही. तुमच्या उपोषणाची मी साक्षीदार आहे, तुम्ही कसे उपोषण केलं हे मी वेळ आल्यावर सांगेन, उपोषण स्थळावरून शिव्या देणे योग्य नाही, छत्रपती शिवराय 18 पगड जातींना घेऊन चालणारे होते, जिल्हाधिकाऱ्यांबद्दल जी भाषा वापरली गेली, ती योग्य नव्हती, असंही यावेळी तारख यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!