AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर यांना फोन करत एकनाथ शिंदे यांनी दिला मोठा शब्द, थेट खुलासा..

Eknath Shinde On Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकर यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या 5 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. काल 6 खासदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आता मोठी माहिती पुढे येत आहे.

मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर यांना फोन करत एकनाथ शिंदे यांनी दिला मोठा शब्द, थेट खुलासा..
Eknath Shinde and Omraje Nimbalkar
| Updated on: Jun 23, 2026 | 8:01 AM
Share

ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली. फक्त ओमराजे निंबाळकरच नाही तर 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली. पक्षाने व्हिप जारी केल्यानंतरही खासदार बैठकीला हजर झाले नाही. या 6 खासदारांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला. याबाबतचे पत्रही त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिले. काल या 6 खासदारांनी जाहीरपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. थेट आपल्या मनातील भावनाही व्यक्त केला. वडील पवनराजे निंबाळकर यांच्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागला नसल्याने ओमराजे निंबाळकर नाराज होते. हेच नाही तर यादरम्यान ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार नसल्याचेही सांगितले जात होते. मुंबईहून थेट पुण्यात ओमराजे निंबाळकर गेले. त्यानतंर ते धाराशिवमध्ये गेले आणि आपला निर्णय स्पष्ट केला. यादरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांसोबतही चर्चा केली.

यादरम्यानच आता मोठी माहिती पुढे येत आहे. ज्यावेळी वडील पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला. त्यावेळी ओमराजे निंबाळकर यांना थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला. ओमराजे निंबाळकर यांना एकनाथ शिंदे यांनी फोन केला, त्यावेळी एकनाथ शिंदे हे अमित शाह यांच्या शेजारी बसले होते. कोल्हापूरमधील कार्यक्रमात होते.

शिंदे अमित शाह यांच्या दूर जाऊन फोनवर बोलतानाही दिसले. एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात नक्की काय बोलणे झाले, याबाबत मोठी माहिती पुढे येत आहे. पवनराजे निंबाळकर प्रकरणाचा निकाल लागताच एकनाथ शिंदे यांनी ओमराजे निंबाळकर यांना फोन केला. एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी कायम उभा हे.. शिवसेना देखील तुमच्यापाठीशी कायम खंबीरपणे आहे.

ओमराजे निंबाळकर यांना एकनाथ शिंदे यांनी दिलासा दिला. फक्त हेच नाही तर एकनाथ शिंदे यांनी थेट ओमराजे निंबाळकर आणि अमित शाह यांच्यातही बोलणे करून दिले. एकनाथ शिंदेंच्या घरी काल ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत 5 खासदार पोहोचले होते. यावेळी त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. हा अत्यंत मोठा धक्का उद्धव ठाकरे यांच्याकरिता म्हणावा लागेल.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!