AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Surya Grahan : दिवसा होणार काळाकुट्ट अंधार ! 21 व्या शतकातलं सर्वात मोठं सूर्यग्रहण कधी ?

२०२७ मधील सूर्यग्रहण शतकातील दुसरी सर्वात मोठी खगोलीय घटना असेल. २७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या ग्रहणात सूर्य सुमारे ६ मिनिटे २२ सेकंद झाकला जाईल, ज्यामुळे दिवसा रात्रीसारखा अंधार होईल. भारतात ते अंशतः दिसेल, तर ११ देशांत पूर्णपणे. ही दुर्मिळ घटना २११४ पर्यंत पुन्हा दिसणार नाही, त्यामुळे तिचे विशेष महत्त्व आहे.

Surya Grahan : दिवसा होणार काळाकुट्ट अंधार ! 21 व्या शतकातलं सर्वात मोठं सूर्यग्रहण कधी ?
सूर्यग्रहणImage Credit source: Unsplash
| Updated on: Mar 10, 2026 | 3:18 PM
Share

Surya Grahan : धार्मिक दृष्टीने पाहिलं तर सूर्य ग्रहण अशुभ मानलं जातं. पण खगोलशास्त्रानुसार ही एक अनोखी, दुर्लभ घटना मानली जाते. जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो, सूर्याच्या किरणांना पृथ्वीवर पोहोचण्यापासून रोखतो आणि पृथ्वीवर चंद्राची सावली पडते, तेव्हा असे मानले जाते की सूर्यग्रहण लागलं आहे. सूर्यग्रहणाची खगोलीय घटना नेहमीच अमावस्येच्या दिवशी घडते.

2026 मध्ये 17 फेब्रुवारी रोजी सूर्यग्रहण झालं आहे. तर या वर्षी दुसरे सूर्यग्रहणही होणार असून ते 12 ऑगस्ट रोजी असेल. परंतु खगोलशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी 2027 या वर्षावर लक्ष ठेवून आहेत. २०२७ हे वर्ष शतकातील सर्वात महत्त्वाच्या आणि दुर्मिळ घटनांपैकी एकाचे साक्षीदार असेल. या वर्षीचे सूर्यग्रहण शतकातील दुसरे सर्वात मोठे सूर्यग्रहण असेल.

दिवसा होईल रात्रीप्रमाणे काळाकुट्ट अंधार

2027 मध्ये होणारे हे शतकातील दुसरे सर्वात मोठे सूर्यग्रहण असून ते 27 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्या दिवशी चंद्र सूर्याला जवळजवळ 6 मिनिटं 22 सेकंदांसाठी पूर्णपणे झाकून टाकेल. जेव्हा हे घडेल तेव्हा दिवसा रात्रीसारखा काळाकुट्ट अंधार होईल. इतक्या दीर्घ कालावधीचे असे दृश्य 2114 मध्येच पुन्हा दिसणार आहे. म्हणूनच पुढचं होणारं हे सूर्यग्रहण, एक अतिशय खास खगोलीय घटना मानली जाते.

भारतातही दिसणार का सूर्यग्रहण ?

पण हे सूर्यग्रहण भारतात पूर्णपणे दिसणार नाही, मात्र अंशतः दिसेल. असं असलं तरी जगातील 11 देशांमध्ये ते पूर्णपणे दिसेल, ज्यामध्ये प्रामुख्याने स्पेन, इजिप्त, सौदी अरेबिया, लिबिया, ट्युनिशिया, येमेन, मोरोक्को, सुदान, सोमालिया, अल्जेरिया आणि जिब्राल्टर या देशांचा समावेश आहे. समावेश आहे.

2009 मध्ये झालं होतं शतकातील सर्वात मोठे ग्रहण

यापूर्वी 21 व्या शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण हे अनेक वर्षांपूर्वी म्हणजे, 22 जुलै 2009 रोजी झाले. या ग्रहणाचा कालावधी 6 मिनिटं आणि 39 सेकंद इतका होता. तर आता पुढल्या वर्षी म्हणजे 027 मध्ये होणार सूर्यग्रहण हे या शतकातलं सर्वात मोठं सूर्यग्रहण असेल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा