लग्नघरात ‘या’ वस्तू चुकूनही ठेऊ नका नाहीतर अनर्थ घडू शकतो….

Vastu Dosh in Marriage House: लग्न घरात वास्तुदोष असण्याचे कारण: लग्न घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी काढून टाकणे खूप महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, लग्नाच्या घरात सुकलेली फुले नसावीत. अशा गोष्टी लग्नाच्या घरात नकारात्मक ऊर्जा आणतातच पण वास्तुदोषाची समस्याही निर्माण करतात. वास्तु दोषाच्या समस्येमुळे घरातील शुभ कामांमध्ये अडथळे येऊ लागतात.

लग्नघरात या वस्तू चुकूनही ठेऊ नका नाहीतर अनर्थ घडू शकतो....
| Edited By: | Updated on: Feb 17, 2025 | 12:22 PM

वास्तुशास्त्रानुसार, ज्या घरात लग्न होणार आहे त्या घरात सकारात्मक ऊर्जा असणे खूप महत्वाचे आहे. सकारात्मक उर्जेसाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, ज्या घरात लग्न होणार आहे, तिथे अशा गोष्टी ठेवाव्यात ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहील. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी, घराच्या दारावर हळद आणि रोळीने स्वस्तिक बनवले जाते. घराच्या दारामध्ये रांगोळी काढावीत.

याशिवाय तुळशी, मनी प्लांट, पीस लिली यांसारखी झाडे घरातील वातावरण सकारात्मक ठेवतात. या गोष्टींमुळे तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे, वास्तुशास्त्रानुसार, ज्या घरात लग्न होणार आहे त्या घरात काही गोष्टी ठेवू नयेत, अन्यथा वास्तुदोषाचा धोका असू शकतो. चला, लग्नाच्या घरात कोणत्या गोष्टी ठेवणे टाळावेत?

वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या उर्जेशी जोडलेली असते. कोणती ऊर्जा कधी कुठे आणि कोणत्या कामासाठी वापरावी या बद्दल देखील शास्त्रामध्ये सविस्तर सांगण्यात आले आहे. उदाहरणार्थ, लग्नाच्या घरात युद्ध, रणांगण किंवा महाभारताशी संबंधित चित्रे लावू नयेत असे म्हणटले जाते यामुळे घरगुती कलह वाढू शकतो. त्यासोबतच तुमच्या घरामधील सकारात्मकता वाढवण्यासाठी संध्याकाळी देवा समोर तुपाचा दिवा लावा. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होण्यास मदत होते.

घरात काटेरी झाडे ठेवू नका….
वास्तुशास्त्रानुसार, ज्या घरात लग्न होणार आहे तिथे काटेरी किंवा टोकदार रोपे ठेवू नयेत. विशेषतः ज्या ठिकाणी किंवा खोलीत तुम्ही हळदी, मेहंदी, कथा इत्यादी विधी करणार आहात, तिथे काटेरी फुले किंवा इतर वनस्पती ठेवू नयेत. असे केल्याने वास्तु दोषाची समस्या उद्भवू शकते आणि तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे येतात.

दक्षिण दिशेला आरसा लावू नका…
दक्षिण दिशेला यमराज आणि पूर्वजांची दिशा म्हणतात, म्हणून दक्षिण दिशेला आरसा ठेवू नये. यामुळे, घरातील लोकांच्या मनात नकारात्मक भावना मूळ धरू शकतात. तसेच, दक्षिण दिशेला आरसा ठेवल्याने अनेक प्रकारचे वास्तुदोष निर्माण होऊ शकतात आणि घरातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल द्वेश निर्माण होतो.

देवता किंवा कुटुंबातील सदस्यांच्या फोटोवर वाळलेल्या फुलांचा हार…
वास्तुशास्त्रानुसार, ज्या घरात लग्न होणार आहे तिथून वाळलेली फुले किंवा वाळलेल्या फुलांच्या माळा काढून टाकाव्यात. बऱ्याचदा, मृत नातेवाईकांच्या फोटोवर किंवा घरातील मंदिरात ठेवलेल्या देवी-देवतांच्या मूर्तींवर फुलांचे हार अनेक दिवस लटकत राहतात. लग्नाच्या घरात वास्तुदोषाचे हे देखील एक प्रमुख कारण आहे. सुक्या फुलांचे हार देखील शक्य तितक्या लवकर दारावरून काढून टाकावेत.

हळद, मेहंदी आणि लग्नाचे सामान दक्षिण दिशेला ठेवावे….
वास्तुशास्त्रानुसार, लग्नाच्या घरात हळद, मेहंदी आणि लग्नाच्या वस्तू दक्षिणेकडे ठेवू नयेत. असे केल्याने घराची ऊर्जा नकारात्मक होऊ शकते. याशिवाय, वास्तुदोष देखील उद्भवू शकतात. दक्षिण दिशा ही यमराज आणि पूर्वजांची दिशा मानली जाते.

Vastu Dosh in Marriage House लग्न घरात वास्तुदोष असण्याचे कारण: लग्न घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी काढून टाकणे खूप महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, लग्नाच्या घरात सुकलेली फुले नसावीत. अशा गोष्टी लग्नाच्या घरात नकारात्मक ऊर्जा आणतातच पण वास्तुदोषाची समस्याही निर्माण करतात. वास्तु दोषाच्या समस्येमुळे घरातील शुभ कामांमध्ये अडथळे येऊ लागतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही