महादेवाची पूजा करताना कधीच करू नका या दोन चुका, ही चूक तर नेहमी होते

महादेवांना देवाचे देव म्हटलं जातं, हिंदू धर्मशास्त्रानुसार महादेव आपल्या भक्तांना कधीही नाराज करत नाहीत. महादेवाची मनोभावे पूजा केल्यास ते लगेचच प्रसन्न होतात. आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात, आणि महादेवाच्या कृपेनं त्यांच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

महादेवाची पूजा करताना कधीच करू नका या दोन चुका, ही चूक तर नेहमी होते
महादेवाची पूजा
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Dec 03, 2025 | 6:33 PM

हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रात देखील महादेवांना देवाचे देव म्हटलं गेलं आहे. असं म्हटलं जातं की तुम्ही जर महादेवांची मनोभावे पूजा केली, प्रार्थना केली, महादेवांची सेवा केली तर ते आपल्या भक्तांवर लगेचच प्रसन्न होतात. महादेव आपल्या भक्तावर आलेलं प्रत्येक संकट दूर करतात. महादेवाच्या आशीर्वादानं तुमच्या नशीबाचे दरवाजे उघडतात. परंतु प्रत्येक देवाची पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते, त्या सर्व पूजा प्रकाराचं सविस्तर वर्णन हिंदू धर्मग्रंथांमध्ये केलं आहे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं पूजा करत असाल तर अशा पुजेचं फळ तुम्हाला मिळत नाही, असंही धर्मशास्त्रात सांगण्यात आलं आहे. आज आपण अशा दोन गोष्टी जाणून घेणार आहोत. ज्या चुका सामान्यपणे कळत -नकळत अनेकदा आपल्या हातून महादेवांची पूजा करताना होतात.

फूलं – सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही महादेवांची पूजा करतात. तेव्हा चुकूनही महादेवांना लाल रंगाची फूलं अर्पण करू नयेत, त्यामुळे पूजा पूर्ण होत नाही, घरात वास्तुदोषही निर्माण होतात. महादेवांची पूजा केल्यानंतर त्यांना नेहमी पांढरी फूलं अर्पण करावीत, ज्यामुळे देव प्रसन्न होतात, तुम्हाला तुमच्या पूजेचं इच्छित फळ मिळतं. मात्र अनेक जण महादेवांची पूजा करताना आपल्या हातात जी फूलं आहेत ती महादेवांना अर्पण करतात. मात्र महादेवांना कधीही लाल रंगाची फूलं अर्पण केली जात नाहीत.

प्रदक्षिणा – अनेक जण ही देखील मोठी चूक करतात, महादेवांची पूजा झाल्यानंतर देवाला प्रदक्षिणा घातली जाते, मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की महादेवांना कधीही पूर्ण प्रदक्षिणा घातली जात नाही, महादेवांना नेहमी अर्धी प्रदक्षिणा घावावी, असं धर्मशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

बेलाची पानं – महादेवांना बेलाचा वृक्ष अत्यंत प्रिय आहे. जोपर्यंत महादेवांना बेलाची पानं वाहिली जात नाही, तोपर्यंत पूजा पूर्ण होत नाही. त्यामुळे महादेवांची पूजा करताना नेहमी बेलाची पान महादेवांना अर्पण करावीत, असं धर्मशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)