Parshuram Jayanti 2022: परशुराम जयंती या दिवशी होणार आहे साजरी; पुजेची वेळही जाणून घ्या

| Updated on: Apr 26, 2022 | 4:32 PM

मुंबईः हिंदू पंचागानुसार अक्षय तृतीया (Akshaya Tritiya) हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या सणाला विशेष असे महत्व आहे, तसेच या सणादिवशी पुजेलाही महत्त्वाचे मानले जाते. मान्यतेनुसार या दिवशी आणखी एक विशेष सण साजरा केला जातो. आहे. अक्षय तृतीया वेगवेगळ्या स्वरूपात साजरी केली जाते. ही तिथी अतिशय शुभ असल्याचे मानली […]

Parshuram Jayanti 2022: परशुराम जयंती या दिवशी होणार आहे साजरी; पुजेची वेळही जाणून घ्या
Parashuram Jayanti
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबईः हिंदू पंचागानुसार अक्षय तृतीया (Akshaya Tritiya) हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या सणाला विशेष असे महत्व आहे, तसेच या सणादिवशी पुजेलाही महत्त्वाचे मानले जाते. मान्यतेनुसार या दिवशी आणखी एक विशेष सण साजरा केला जातो. आहे. अक्षय तृतीया वेगवेगळ्या स्वरूपात साजरी केली जाते. ही तिथी अतिशय शुभ असल्याचे मानली जाते. या दिवशी दानधर्माव्यतिरिक्त सोने खरेदीलाही महत्त्व दिले आहे. विवाह वगैरे मंगलमय कार्ये या दिवशी मुहूर्ताविना केली जातात. अशी अख्यायिका सांगितली जाते की, पुराणात वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी भगवान विष्णूने (Lord Vishnu) सहावा अवतार घेतल्याचे सांगितले जाते. आणि तो अवतार होता परशुरामाच.

त्यामुळे या कारणामुळेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी परशुराम जयंतीही (Parashuram Jayanti) साजरी केली जाते. पुराणानुसार महर्षी जमदग्नींनी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला आणि त्यानंतर देवराज इंद्राला प्रसन्न करून पुत्रप्राप्तीचे वरदान मिळाले असल्याची कथाही सांगितली जाते. त्यानंतर वैशाख शुक्ल तृतीयेला महर्षींची पत्नी रेणुकाने परशुरामाला जन्म दिला. या परशुरामाची यंदा 3 मे रोजी जयंती साजरी केली जाणार आहे.

परशुराम जयंती 2022 कधी आहे ते जाणून घ्या

हिंदू कॅलेंडरनुसार, परशुराम जयंती विशेषतः वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला देशातील विविध भागात साजरी केली जाते. तृतीया तिथी मंगळवार 3 मे रोजी पहाटे 5.20 वाजता सुरू होणार आहे. जी बुधवार 4 मे रोजी सकाळी 7.30 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत या दिवशी केलेले पुण्य कधीच संपत नाही असेही मानले जाते.

परशुराम जयंकीची तिथी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

परशुराम जयंतीली 3 मे रोजी पहाटे 5:20 वाजता तृतीया तिथी सुरू होणार आहे. 4 मे 2022 रोजी बुधवारी सकाळी 7:30 वाजेपर्यंत तृतीया तिथी समाप्त होणार असल्याचे पंचागमध्ये नमूद केले आहे.

परशुराम जयंतीचे महत्त्व

सनातन धर्मात परशुराम जयंतीला वेगळे महत्त्व असल्याचे मानले जाते. या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावे आणि त्यानंतर नियमानुसार भगवान परशुरामाची पूजा-अर्चा करावी असे सांगितले जाते. त्यामुळे इच्छित फळ मिळते आणि सर्व त्रास दूर होतो असेही सांगितले जाते. एवढेच नाही तर परशुराम जयंती ही संतती प्राप्तीसाठी महत्त्वाची मानली जाते. परशुराम जयंतीला भुकेल्यांना अन्नदान केल्याने त्यादिवशी त्यालाही महत्त्व प्राप्त झाले आहे.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)