Lakshmi Puja: दिवाळीत लक्ष्मीपूजन करताय? पूजेत ‘या’ 6 वस्तू वर्ज्य मानल्या जातात, अजिबात अर्पण करू नका

Lakshmi Puja: आज लक्ष्मीपूजन आहे. आजच्या दिवशी लक्ष्मीसोबतच गणपतीची देखील पूजा करतात. पण पूजेत 6 वस्तू वर्ज्य मानल्या जातात. तर जाणून घ्या कोणत्या आहेत, त्या वस्तू..

Lakshmi Puja: दिवाळीत लक्ष्मीपूजन करताय? पूजेत या 6 वस्तू वर्ज्य मानल्या जातात, अजिबात अर्पण करू नका
| Updated on: Nov 08, 2026 | 3:28 PM

Diwali Lakshmi Puja Tips: दिवाळीत सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन… आज म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी प्रत्येक जण घरात लक्ष्मीपूजन करतील. पण लक्ष्मीपूजनाचे देखील काही नियम आहेत. जे प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. सांगायचं झालं तर, दिवाळीच्या रात्री माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व असतं. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी विधीनुसार पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. यामुळेच लोक दिवाळीच्या रात्री माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजा-अर्चा करतात. अनेकदा लोक माता लक्ष्मीच्या पूजेदरम्यान त्यांना विविध प्रकारची फुले, फळे आणि इतर पूजेचे साहित्य अर्पण करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, काही अशा गोष्टीसुद्धा आहेत, ज्या माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये वाहणे वर्ज्य मानल्या जातात… तर जाणून घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी…

लक्ष्मी जीला काय वाहू नये?

Loading...

भगवान विष्णूला तुळशी अत्यंत प्रिय मानली जाते, परंतु माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये तुळशीची पाने किंवा मंजुळा अर्पण करणे वर्ज्य मानलं गेलं आहे. त्यामुळे दिवाळीला लक्ष्मी पूजन करताना पूजेच्या साहित्यात तुळशीचा समावेश करु नका… असं अनेकांचं म्हणणं आहे.

माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये लाल, गुलाबी आणि पिवळ्या रंगाची फुले वाहणे शुभ मानलं जातं. कमळ, गुलाब आणि झेंडूची फुले मातेला अर्पण केली जातात. दुसरीकडे, धार्मिक मान्यतेनुसार, माता लक्ष्मीला चंपा, रात्रराणी, मोगरा, चांदनी आणि तगर यांसारखी पांढऱ्या रंगाची फुले वाहू नयेत. पांढऱ्या रंगाचं कोणतं फूल अर्पण करु नका.

रुईचे फूल भगवान शिवाच्या पूजेमध्ये विशेष रूपाने वापरलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, हे फूल माता लक्ष्मीला अर्पण केलं जात नाही. त्यामुळे लक्ष्मी पूजनासाठी फुलांची निवड करताना या गोष्टीची काळजी घ्यावी.

भगवान गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वांना विशेष महत्त्व असते. गणपतीला दुर्वा वाहणं अत्यंत शुभ मानलं जातं, परंतु माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये ती अर्पण केली जात नाही. त्यामुळे दोघांची पूजा करताना त्यांच्या वेगवेगळ्या पूजेच्या साहित्याची काळजी घ्यावी.

माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये नेहमी ताजी आणि फुललेली फुले वापरली पाहिजेत. कधीही मातेला सुकलेली, कोमेजलेली, कापलेली-फाटलेली किंवा कीड लागलेली फुले अर्पण करू नयेत. धार्मिक मान्यतेनुसार, पूजेमध्ये स्वच्छ आणि ताज्या साहित्याला विशेष महत्त्व असतं.

दिवाळीला माता लक्ष्मीची पूजा करताना आपल्या कपड्यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. धार्मिक मान्यतेनुसार, या काळात काळे किंवा गडद निळे रंगाचे कपडे घालणे टाळावे. त्याऐवजी लाल, पिवळ्या किंवा गुलाबी रंगाचे कपडे शुभ मानले जातात.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us