Pitrupaksha 2023 : पितृपक्षात चुकूनही करू नये या गोष्टींचे सेवन, करावा लागतो पितृदोषाचा सामना

पितृपक्षाचे काही नियमही आहेत. यामध्ये काही पदार्थ सेवन करणे निषिद्ध आहे. या काळात  हे अन्नपदार्थाचे सेवन केल्यास पितरांच्या नाराजीचा सामना करावा लागतो.

Pitrupaksha 2023 : पितृपक्षात चुकूनही करू नये या गोष्टींचे सेवन, करावा लागतो पितृदोषाचा सामना
पितृपक्ष
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 09, 2023 | 10:14 AM

मुंबई : पितृपक्षात (Pitrupaksha 2023) पिंडदान किंवा श्राद्ध पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जाते. मृत व्यक्तीचा मोठ्या मुलाने त्यांच्या तिथीला श्राद्ध करण्याचे महत्त्व आहे. खास तयार केलेले अन्न घराबाहेर किंवा घराच्या छतावर कावळ्यांना दिले जाते. याशीवाय गाईलाही पान लावले जाते. देवघर, झारखंडचे पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांना गती प्राप्त होते. त्याचबरोबर पितृपक्षाचे काही नियमही आहेत. यामध्ये काही पदार्थ सेवन करणे निषिद्ध आहे. या काळात  हे अन्नपदार्थाचे सेवन केल्यास पितरांच्या नाराजीचा सामना करावा लागतो.

वर्षातील 15 दिवस असे असतात की जेव्हा तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या स्मरणार्थ श्राद्ध करता किंवा पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान करता. दुसरीकडे पितृपक्षाच्या दिवसात पितर कोणत्या ना कोणत्या रूपाने पृथ्वीवर येतात आणि आपल्या नातेवाईकांना आशीर्वाद देतात, परंतु आपण खाण्यापिण्याच्या बाबतीत अशी चूक करतो, ज्यामुळे पितरांना राग येतो आणि त्याचा अशुभ परिणाम होऊ लागतो.

या पदार्थांचे सेवन करण्यास मनाई आहे

मांस-दारू : शास्त्रात सांगितले आहे की, पितृपक्षाच्या दिवसात चुकूनही मांस आणि मद्य सेवन करू नका. यामुळे पूर्वजांना राग येतो आणि त्याचा थेट परिणाम वंशजांवर होतो.

लसूण कांदा : पितृपक्षाच्या दिवशी लसूण-कांदा खाण्यास मनाई आहे. कारण कांद्याला तामसिक आहाराच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. पितृपक्षात सात्विक अन्न खावे जेणेकरून विचारात साधेपणा राहील.

हरभरा : पितृपक्षाच्या काळात हरभरा खाऊ नये. हे अशुभ मानले जाते. हरभरा सत्तू असो वा हरभरा डाळ किंवा हरभरा मिठाई.

मसूर डाळ : पितृ पक्षाच्या काळात मसूर डाळ निषिद्ध आहे. फक्त शिजवलेले अन्न खावे. ते शुभ मानले जाते. त्याचबरोबर मसूर आणि हरभऱ्याची डाळ हे सर्व अशुभ मानले जाते.

पितृपक्ष कधी आहे?

भाद्र महिन्याची पौर्णिमा संपताच, पितृपक्ष सुरू होईल, म्हणजेच 30 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 14 ऑक्टोबर, अमावस्या तिथीपर्यंत चालेल. एकूण 15 दिवस पिंडदान केले जाईल. पितृपक्षात, बिहारमधील गया येथे आपल्या पूर्वजांना पिंडदान करण्यासाठी देशभरातून लोकं येतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)