
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत काही ना काही दोष असतो. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी कधी हातातोंडाशी आलेला घासही व्यवस्थित खायला मिळत नाही. कालसर्प दोष हा एक असाच दोष आहे. हा दोष सर्वात घातक मानला जातो. यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात अनेक अडचणी उभ्या राहतात. कालसर्प योगामुळे आर्थिक, शारीरिक, शैक्षणिक आणि मुलांशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागतो. ज्योतिषशास्त्रात कालसर्प योग दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहे. पण तुम्हाला या कालसर्प योगातून दिलासा हवा असेल तर नागपंचमीला एक रामबाण उपाय करू शकता. चला जाणून घेऊयात उपाय
कालसर्प दोष निवारण करण्यासाठी सर्वात सरळ आणि सोपा उपाय म्हणजे पूजा करणे. ज्योतिषशास्त्रानुसार, कालसप्र दोष जितका जुना तितका अधिक घातक ठरतो. यासाठी हा दोष दूर करण्यासाठी पूजा करणं आवश्यक आहे. कालसर्प दोष दूर करण्यासाठी मंत्र जप, शिवलिंगावर दुधाभिषेक, महादेवाच्या मंदिरात पूजा केल्याने कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो. पण यातून सुटका काही होत नाही. हा दोष कायमचा दूर करण्यासाठी कालसर्प दोष निवारण पूजा करणं एकमेव उपाय आहे.
कालसर्प दोष निवारण पूजा महादेवांना प्रसन्न करण्यासाठी केली जाते. कारण सापांचा निवास हा महादेवांच्या गळ्यावर आहे. कालसर्प दोष निवारण पूजा केल्यानंतर एकाच दिवसात तु्म्ही या दोषातून मुक्त होऊ शकतात. भारतात अनेक ठिकाणी कालसर्प दोष निवारणासाठी पूजा केली जाते. नाशिकचं त्र्यंबकेश्वर, उज्जैनचं महाकाल मंदीर यासाठी उचित मानलं गेलं आहे. कारण या ठिकाणी भगवान शिवांचा वास आहे. हा पूजा पाठ तुम्ही नागपंचमीच्या दिवशी केला तर त्याचं आणखी चांगलं फळ मिळू शकते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)