Pradosh Vrat : या दिवशी आहे श्रावण महिन्यातला दूसरा प्रदोष व्रत, अशाप्रकारे करा महादेवाची आराधना

प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवासोबत पार्वतीचीही पूजा केली जाते. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने भगवान शिवशंकर आणि देवी पार्वतीचा विशेष आशीर्वाद मिळतो

Pradosh Vrat : या दिवशी आहे श्रावण महिन्यातला दूसरा प्रदोष व्रत, अशाप्रकारे करा महादेवाची आराधना
शिवलींगImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 8:46 PM

मुंबई : हिंदू धर्मात प्रदोष व्रत (pradosh Vrat) प्रत्येक महिन्यात भगवान शंकराची पूजा करण्यासाठी पाळले जाते. हे व्रत विशेषतः दर महिन्याच्या दोन पंधरवड्यातील त्रयोदशी तिथीला – कृष्ण आणि शुक्ल पक्ष पाळला जातो. प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवासोबत पार्वतीचीही पूजा केली जाते. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने भगवान शिवशंकर आणि देवी पार्वतीचा विशेष आशीर्वाद मिळतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच जीवनात आनंद येतो. हे व्रत केल्याने रोग, ग्रह दोष, त्रास, पाप इत्यादीपासून मुक्ती मिळते.

शुभ वेळ

महादेवाचा आवडता महिना श्रावण सुरू आहे, आणि या महिन्यातील दूलरे प्रदोष व्रत 12 सप्टेंबर2023 रोजी आहे, ज्याला ‘भौम प्रदोष व्रत’ असेही म्हणतात कारण हा दिवस मंगळवारी येत आहे. या महिन्याच्या प्रदोष व्रतातील त्रयोदशी तिथी 11 सप्टेंबर रोजी रात्री 11.52 वाजता सुरू होईल आणि 13 सप्टेंबर रोजी पहाटे 2.21 वाजता समाप्त होईल. उपवास आणि पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त संध्याकाळी 6.30 ते 8.49 पर्यंत आहे.

प्रदोष व्रताचे लाभ

रामभक्त मानल्या जाणाऱ्या हनुमानजींना भगवान शिवाचे रुद्रावतार मानले जाते. त्यामुळे प्रदोष व्रत विधीने पाळल्याने जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळते. विशेषत: मंगळ दोष असलेल्या लोकांसाठी हे व्रत अधिक महत्त्वाचे आहे, कारण यामुळे वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात. याशिवाय शारीरिक वेदनांपासूनही आराम मिळतो. प्रदोष व्रताने भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळतो. या व्रतामुळे जीवनातील अडथळे आणि अडचणी दूर होतात, मानसिक शांती मिळते आणि धन, समृद्धी आणि आरोग्य वाढते. हे व्रत केल्याने भक्ताचे जीवन सुखी होते.

हे सुद्धा वाचा

उपासनेची पद्धत

उपवास आणि उपासनेची पद्धत थोडक्यात जाणून घेऊया. सकाळी स्नान करून व्रत करण्याचा संकल्प करावा. हनुमानजींना चोला अर्पण करावा आणि संध्याकाळी स्नान करून पुन्हा भगवान शंकराची पूजा करावी. शिवलिंगावर बेलची पाने, दूध, दही, मध आणि गूळ यांचा अभिषेक करावा. त्यानंतर धूप, दिवा आणि भोग अर्पण करून ‘ओम नमः शिवाय’ मंत्राचा जप करावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.