जर तुमच्या स्वप्नात सतत मृत नातेवाईक दिसत असतील तर त्याचा अर्थ काय होतो? प्रेमानंद महाराजांनी सांगितले याचं उत्तर

अनेकदा आपल्याला अशी काही स्वप्न पडतात ज्यांचा अर्थ लक्षात येत नाही. जसं की स्वप्नात वारंवार मृत नातेवाईक दिसणे. अनेकदा आपल्याला अशी स्वप्न पडतात पण याचा अर्थ आपल्याला माहित नसतो. प्रेमानंद महाराजांनी या स्वप्नांचा अर्थ सांगितला आहे.

जर तुमच्या स्वप्नात सतत मृत नातेवाईक दिसत असतील तर त्याचा अर्थ काय होतो? प्रेमानंद महाराजांनी सांगितले याचं उत्तर
meaning of constantly seeing dead relatives in dreams
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 28, 2025 | 1:55 PM

आपण सर्वजण बऱ्याचदा हे अनुभवतो की आपल्या स्वप्नात अनेकदा आपल्या जवळच्या वैक्तींपैकी कोणी ना कोणी येत असतं. काही जणांच्या बाबतीत तर अशापद्धतीच्या स्वप्नांचा प्रकार वारंवार घडत असतो. त्यावेळी नक्कीच मनात अनेक विचार येऊन जातात. किंवा काही वेळेला घाबरल्यासारखंही होतं. त्याची नेमकी कारण माहित नसल्यानं आपण अनेक तर्क-वितर्क लावू लागतो. पण या स्वप्नांचा अर्थ सांगितला आहे संत प्रेमानंद महाराज यांनी.

वृंदावनचे प्रसिद्ध संत प्रेमानंद जी महाराज यांचे लाखो अनुयायी आहेत. महाराज त्यांच्या प्रवचनांमध्ये अनेकदा भक्तांच्या शंकांचे निरसन करताना दिसतात. एका भक्ताने महाराजांना असाच एक प्रश्न विचारला की मृत नातेवाईक सतत स्वप्नात दिसत असतील तर, याचा अर्थ काय समजावा? यावर महाराजांनी उत्तर देऊन या शंकेच निरसन केलं. महाराजांनी काय उत्तर दिलं ते जाणून घेऊयात.

स्वप्नांचे तीन प्रकार
भक्ताच्या प्रश्नाचे उत्तर देताना प्रेमानंद महाराज म्हणाले की, “स्वप्नांचे तीन प्रकार असतात. पहिले स्वप्न असे असते ज्यामध्ये मृत कुटुंबातील सदस्य दिसतात. दुसरे स्वप्न असे असते ज्यामध्ये देव आणि संत दिसतात. तिसरे स्वप्न असे असते जे अस्तित्वात नसते.”

मनाचे नाते
प्रेमानंद महाराज म्हणाले की, बऱ्याचदा माणसाचे मन अनेक लोकांशी जोडलेले असते. हे लोक जिवंत तसेच मृत नातेवाईक असू शकतात.

स्वप्नात मृत व्यक्ती पाहणे
महाराज म्हणाले की जर तुम्हाला स्वप्नात एखादा मृत नातेवाईक दिसला तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. असे नाही की तुम्ही काही वाईट केले आहे ज्यामुळे ते तुम्हाला इशारा देऊ इच्छितात, असे काहीही घडत नाही. म्हणून घाबरण्याचे काहीही कारण नाही.

दान करण्याची सवय
प्रेमानंद महाराज पुढे म्हणाले की जर अशी स्वप्ने पडली तर दानधर्म करण्याची सवय लावा. ही सवय सर्वसाधारणपणे देखील असली पाहिजे.

पूर्वजांना समाधान मिळते
महाराज म्हणतात की ,”जर तुम्ही सतत पाणी आणि अन्न दान केले पाहिजे. हे दान पूर्वजांपर्यंतही पोहोचते. जेव्हा तुम्ही दान करता तेव्हा ते पूर्वजांना समाधान देते.”

मृत्यूनंतर दानधर्म करा.
त्यांनी सांगितले की पिंडदान देखील याच कारणासाठी केले जाते. कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती जिवंत असताना त्यांची सेवा करावी आणि त्यांच्या मृत्यूनंतर दान करावे. असा उपदेशही त्यांनी सर्वांना दिला.