
लोकप्रिय आध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनाला सामान्यांपासून ते अगदी सेलिब्रिटीपर्यंत सर्वजण येतात. त्यांचा आशीर्वादही घेतात आणि त्यांना अनेक सल्लेही विचारतात. सर्व देशभरात प्रेमानंद महाराजांचे भक्त आहेत. आणि त्यांची फक्त देशातच नाही तर परदेशातही चर्चा आहे. पण अनेकांना असा प्रश्न असतो की प्रेमानंद महाराजांची संपत्ती आहे का? किंवा ते कुठे राहतात, त्यांच्याकडे कार आहे का किंवा अगदी साधा पडलेला प्रश्न म्हणजे प्रेमानंद महाराज फोन कोणता वापरतात. चला या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.
प्रेमानंद महाराजांची एकूण संपत्ती किती आहे?
साधेपणासाठी प्रसिद्ध असलेले प्रेमानंद महाराज यांचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर पाहिले असतील. त्या व्हिडिओंमध्ये तुम्ही त्यांना अनेकदा चालताना आणि कधीकधी गाडीतून जाताना पाहिले असेल, त्यानंतर त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल अनेक प्रश्न सोशल मीडियावर सर्च केले जातात. त्यांच्या मालमत्तेबद्दल, प्रेमानंद महाराजांनी स्वतः एकदा सांगितले होते की त्यांची वैयक्तिक अशी कोणतीही मालमत्ता नाही. किंवा त्यांचे कोणतेही बँक खाते नाही. ते संताचे जीवन जगतात आणि त्यांच्या नावावर कोणतेही घर, जमीन अशी कोणतीही प्रॉपर्टी नाही.
प्रेमानंद महाराजांकडे गाडी आहे का?
प्रेमानंद महाराजांकडे वैयक्तिक गाडी नाही, जरी ते अनेकदा ऑडी कारमधून जाताना, प्रवास करताना दिसतात परंतु ती त्यांची स्वतःची कार नसून त्यांच्या सेवकांची आहे. त्यामुळे जर त्यांना कुठे जायचे असल्यास सेवकांपैकीच कोणा एकाच्या कारने ते प्रवास करतात.
प्रेमानंद महाराज कोणता फोन वापरतात
हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. की प्रेमानंद महाराज कोणता फोन वापरतात. पण खरंतर महाराज मोबाईल फोन वापरतच नाही. तसेच फोन कसा वापरायचा हे त्यांना माहितही नाही. त्यांचे जीवन पूर्णपणे त्याग आणि आध्यात्मिक साधनासाठी समर्पित आहे. भौतिक संपत्तीच्या पलीकडे ते जीवन जगतात. त्यांचे ना बँक खाते आहे, ना कोणत्याही प्रकारची वैयक्तिक मालमत्ता. ते पूर्णपणे साधू जीवन जगतात, ज्यामध्ये भौतिक गोष्टींना स्थान नाही.
प्रेमानंद महाराजांचे खरे नाव काय आहे?
प्रेमानंद महाराजांचे खरे नाव अनिरुद्ध कुमार पांडे आहे. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील सारसोल ब्लॉकमधील आखरी गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्री शंभू पांडे आणि आईचे नाव श्रीमती रमा देवी आहे. प्रेमानंदजींनी पाचवीपासूनच गीता वाचण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्यांचा कल हळूहळू अध्यात्माकडे वळाला. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी त्यांनी ब्रह्मचारी होण्याचा निर्णय घेतला आणि घर सोडले आणि संन्यासी जीवनाकडे वळले. तेव्हापासून ते आजपर्यंत ते तसेच जीवन जगत आहेत.