Ram Navratra : आजपासून रामाच्या नवरात्रीला सुरूवात, काय आहे महत्त्व?

| Updated on: Mar 22, 2023 | 2:15 PM

चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूचा सातवा अवतार असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांचा राजा दशरथाच्या घरी जन्म झाला.

Ram Navratra : आजपासून रामाच्या नवरात्रीला सुरूवात, काय आहे महत्त्व?
राम नवमी
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला रामाच्या नवरात्राला सुरुवात होते. देवीच्या नवरात्रासारखीच सरळ सोपी पूजा असते. पूजेच्याही आधी वातावरणात जो उत्साह भरलेला असतो त्याने मन प्रसन्न होते. अनेक ठिकाणी रामाची पालखी निघते. राम मंदिरात नवरात्राचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. पुढे नऊ दिवस सकाळ संध्याकाळ आरती, रामरक्षा, प्रसाद असतो आणि नवमीला रामजन्म. अशा पद्धतीने हे नवरात्र पार पडते.  हिंदू नववर्ष चैत्र महिन्यापासून सुरू होते. या महिन्यात नवरात्रीत नऊ दिवस शक्ती साधना केली जाते. चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवसाला विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी श्रीरामाचा जन्म झाला होता. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूचा सातवा अवतार असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांचा राजा दशरथाच्या घरी जन्म झाला. 2023 मध्ये चैत्र नवरात्रीला 22 मार्च 2023 पासून सुरुवात होत आहे. चला जाणून घेऊया रामनवमी कधी साजरी केली जाईल, पूजेचा शुभ मुहूर्त.

राम नवमी 2023 तारीख

नवीन वर्षात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी म्हणजेच 30 मार्च 2023 रोजी रामनवमीचा सण साजरा केला जाईल. या दिवशी राम मंदिरात भजन, कीर्तन, मिरवणूक काढली जाते. हिंदूंसाठी या सणाला विशेष महत्त्व आहे. संपूर्ण भारतात हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, परंतु अयोध्येतील रामजन्मभूमीचे सौंदर्य वेगळे आहे.

राम नवमी 2023 मुहूर्त

पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी 29 मार्च 2023 रोजी रात्री 9.07 वाजता सुरू होत आहे. 30 मार्च 2023 रोजी रात्री 11.30 वाजता नवमी तिथी समाप्त होईल.

हे सुद्धा वाचा

राम नवमी मध्याह्न मुहूर्त – सकाळी 11:17 – दुपारी 01:46

कालावधी – 02 तास 28 मिनिटे

राम नवमी पूजेचे महत्त्व

पुराण म्हणतात “रमन्ते सर्वत्र इति रामः” म्हणजे राम सर्वत्र व्याप्त आहे. सनातन धर्माच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी श्रीरामाच्या रूपात मानवरूपात जन्म घेतला. असे मानले जाते की रामनवमीला भगवान रामाची पूजा केल्याने कीर्ती आणि सौभाग्य प्राप्त होते आणि जीवनात नेहमी सुख आणि समृद्धी राहते. भगवान रामाची पूजा केल्याने जीवनात सकारात्मकता राहते आणि सर्व कामे पूर्ण होतात. या दिवशी रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने जीवनातील सर्व काही अनुकूल होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)