AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravivar Upay : कामात येत असतील वारंवार अडथळे तर रविवारी अवश्य करा हे उपाय

सूर्यदेवाच्या कृपेने व्यक्तीच्या आयुष्यात खूप प्रगती होते आणि त्याचे आरोग्य नेहमी चांगले राहते. कुंडलीत सूर्य बलवान असेल तर जीवनात सुख, संपत्ती आणि कीर्ती मिळते.

Ravivar Upay : कामात येत असतील वारंवार अडथळे तर रविवारी अवश्य करा हे उपाय
सूर्य उपासना Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Apr 08, 2023 | 8:38 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात, प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे. सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी रविवार (Ravivar Upay) सर्वोत्तम मानला जातो. ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला ग्रहांचा राजा म्हटले जाते. सूर्यदेवाच्या कृपेने व्यक्तीच्या आयुष्यात खूप प्रगती होते आणि त्याचे आरोग्य नेहमी चांगले राहते. कुंडलीत सूर्य बलवान असेल तर जीवनात सुख, संपत्ती आणि कीर्ती मिळते. दुसरीकडे, जर सूर्य अशक्त किंवा पीडित स्थितीत असेल तर व्यक्ती अनेकदा आजारी राहतो, धनहानी होते आणि केलेले कामही बिघडू लागते. रविवारी काही खास उपाय केल्याने या सर्व समस्या दूर होतात. या उपायांबद्दल जाणून घेऊया.

स्नानानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे

रविवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. अर्घ्य अर्पण करताना ‘ओम सूर्याय नमः ओम वासुदेवाय नमः ओम आदित्य नमः’ या मंत्राचा अवश्य जप करा. यामुळे सूर्यदेव लवकरच प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.

देशी तुपाचा दिवा लावा

रविवारी घराच्या बाहेरील दरवाजाच्या दोन्ही बाजूला देशी तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की याने तुपाचा दिवा लावल्याने सूर्यदेवासह माता लक्ष्मीही प्रसन्न होते. धनप्राप्तीसाठी हे खूप शुभ मानले जाते.

चंदनाचा तिलक लावावा

रविवारी घरातून चंदनाचा टिळक काढावा. असे मानले जाते की असे केल्याने तुम्ही जे काही कामासाठी बाहेर जात आहात ते नक्कीच पूर्ण होते. यासोबतच रविवारी लाल रंगाचे कपडे घालणे देखील शुभ मानले जाते.

रविवारी या वस्तूंचे दान करा

रविवार हा दानासाठी अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी गूळ, दूध, तांदूळ आणि कपडे दान करा. यामुळे तुमच्या कोणत्याही कामात अडथळा येणार नाही आणि तुम्हाला यश मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?