AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने मिळते शनि पीडेतून मुक्तता! वाचा या मागची पौराणिक कथा!

हिंदू धर्मग्रंथांमध्ये पिंपळाचे झाड अतिशय आदरणीय मानले जाते. असे मानले जाते की, या झाडामध्ये भगवान विष्णूचे वास्तव्य आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने या झाडाला त्याचे स्वतःचे रूप असल्याचे वर्णन केले आहे.

पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने मिळते शनि पीडेतून मुक्तता! वाचा या मागची पौराणिक कथा!
शनिदेव
| Updated on: Feb 19, 2021 | 10:36 AM
Share

मुंबई : हिंदू धर्मग्रंथांमध्ये पिंपळाचे झाड अतिशय आदरणीय मानले जाते. असे मानले जाते की, या झाडामध्ये भगवान विष्णूचे वास्तव्य आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने या झाडाला त्याचे स्वतःचे रूप असल्याचे वर्णन केले आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार, शनिवारी पिंपळाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा पेटवल्याने शनिच्या साडेसाती, प्रभाव आणि इतर परिणामांपासून मुक्तता मिळते. म्हणून शनिवारी शनिवारी होणारे त्रास टाळण्यासाठी लोक या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करतात. चला तर, जाणून घेऊया त्यामागील पौराणिक कथा…(Resolve shani sadesati and mahadasha by lighting lamp under peepul tree)

सूर्यपुत्र शनिदेवाची कथा

पौराणिक कथेनुसार, एकेकाळी स्वर्गात असुरांचा कारभार होता. कैताभ नावाच्या राक्षसाने पिंपळाच्या झाडाचे रूप धारण करून यज्ञाचा नाश करण्यास सुरुवात केली. जेव्हा जेव्हा एखादा ब्राह्मण समिधांसाठी पिंपळाच्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी झाडावर जात असे, तेव्हा तो राक्षस त्यास खाऊन टाकायचा. ब्राह्मण कुमार कसे गायब होत आहेत, हे ऋषींना समजू शकले नाही.

त्यानंतर ऋषी सूर्यपुत्र शनिदेवाची मदत घेण्यासाठी गेले. शनिदेवाने ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि पिंपळाच्या झाडाजवळ गेले, त्यावेळी कैताभने शनि देवाला पकडले. यानंतर शनिदेव आणि कैताभ यांच्यात युद्ध झाले. शनि महाराजांनी कैताभची हत्या केली. यानंतर ऋषीमुनींनी शनिची पूजा-अर्चना केली. यानंतर शनि यांनी ऋषींना सांगितले की, आतापासून शनिवारी जो कोणी पिंपळाच्या झाडाची पूजा करेल, त्याच्यासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा पेटवेल, त्याला शनिच्या पीडेतून मुक्ती मिळेल (Resolve shani sadesati and mahadasha by lighting lamp under peepul tree).

आणखी एक पौराणिक कथा

या व्यतिरिक्त, एका अन्य आख्यायिकेनुसार, भगवान शिव यांचा अवतार मानल्या जाणार्‍या ऋषी पिप्लादचे पालक बालपणातच मृत्यू पावले. मोठा झाल्यानंतर, जेव्हा पिप्लादला समजले की, शनिच्या दशेमुळे त्याच्या आईवडिलांचा मृत्यू झाला आहे, तेव्हा त्याने शनिदेवला धडा शिकवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. तपश्चर्येने ब्रह्माला प्रसन्न करून त्याने ब्रह्मदंड मागितला आणि तो शनिदेवच्या शोधात बाहेर पडला. यावेळी, जेव्हा त्याने शनिदेवाला पिंपळाच्या झाडावर बसलेले पाहिले, तेव्हा त्याने शानिदेवावर ब्रह्मदंडाने जोरदार प्रहार केला.

यामुळे शनिचे दोन्ही पाय तुटले. दु:खी होऊन, शनिदेवने भगवान शिवांना हाक दिली, तेव्हा भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी पिप्लादचा राग शांत केला आणि शनिदेवच्या जीवनाचे रक्षण केले. तेव्हापासून शनिदेव पिप्लादला घाबरू लागले. असे मानले जाते की, पिप्लादचा जन्म पिंपळाच्या झाडाखाली झाला होता आणि त्याने पिंपळाची पाने खाऊनच ध्यान केले. म्हणूनच, शनिवारी, जो पिंपळाच्या झाडाची पूजा करतो, त्याला ऋषी पिप्लादचा आशीर्वाद मिळतो आणि शनिदेव त्याला त्रास देत नाहीत.

(टीप : सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, याद्वारे कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही.)

(Resolve shani sadesati and mahadasha by lighting lamp under peepul tree)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.