AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jaya Ekadashi  2021 | पुण्यदायी ‘जया एकादशी’ व्रत, जाणून घ्या याची कथा आणि मुहूर्त

धार्मिक मान्यतानुसार ‘जया एकादशी’ (Jaya Ekadashi 2021) व्रत अत्यंत पुण्यवान मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी उपवास ठेवल्यास मानवी आयुष्यातील सर्व पापे दूर होतात.

Jaya Ekadashi  2021 | पुण्यदायी ‘जया एकादशी’ व्रत, जाणून घ्या याची कथा आणि मुहूर्त
जया एकादशी
| Updated on: Feb 18, 2021 | 10:31 AM
Share

मुंबई : धार्मिक मान्यतानुसार ‘जया एकादशी’ (Jaya Ekadashi 2021) व्रत अत्यंत पुण्यवान मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी उपवास ठेवल्यास मानवी आयुष्यातील सर्व पापे दूर होतात. तसेच, हा उपवास ठेवणाऱ्यांना वाईट योनी अर्थात भूत, प्रेत, पिशाच्च योनीतून मुक्ती मिळते (Jaya Ekadashi 2021 Vrat katha and pooja vidhi).

जया एकादशीच्या व्रतानंतरच राजा हरिश्चंद्र यांना त्यांचे हरलेले राज्य पुन्हा मिळाले आणि त्यांचे सर्व दु:ख दूर झाले. यावेळी जया एकादशी 2021 (Jaya Ekadashi 2021) 23 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. त्याला ‘अन्नदा एकादशी’ किंवा ‘कामिका एकादशी’ असेही म्हणतात.

‘हे’ आहेत व्रताचे नियम

ज्यांना हे व्रत करायचे आहे, त्यांनी दशमीच्या तारखेपासून उपवासाच्या नियमांचे पालन सुरू केले पाहिजे. नियमांनुसार दशमीच्या रात्री उपवास ठेवणाऱ्यांनी सात्विक भोजन करावे. कांदा आणि लसूण घालून बनवलेले तामसिक अन्न घेऊ नये. तसेच, डाळ, चणे आणि बेसन पिठापासून बनवलेल्या गोष्टी खाऊ नयेत. मध खाणे देखील टाळावे. व्रत पूर्ण होईपर्यंत पूर्णपणे ब्रह्मचर्य पाळले पाहिजे.

व्रताची विधी

एकादशीच्या दिवशी आंघोळ केल्यावर पूजेच्या ठिकाणी स्वच्छता केल्यानंतर तिथे गंगेचे पाणी शिंपडावे. नंतर चौरस किंवा पाटावर पिवळ्या रंगाचे कापड घालून नारायणाची मूर्ती ठेवावी. भगवान विष्णूचे ध्यान करून व्रताचा संकल्प सोडवा आणि नंतर भक्तिभावाने आणि प्रेमाने त्याला धूप, दीप, चंदन, फळ, तीळ आणि पंचामृत अर्पण करावे. नंतर व्रताची कथा वाचून आरती करावी. त्यानंतर दिवसभर उपवास ठेवावा. रात्री फलाहार करू शकता. पण फक्त गोड फळे खावीत. शक्य असल्यास रात्रभर भजन कीर्तन करुन जागरण करावे. दुसर्‍या दिवशी म्हणजेच द्वादशीला स्नान करून, दान करावे आणि मग अन्न ग्रहण करावे. उपवासाच्या दिवशी कोणाची निंदा करु नये आणि मनात वैर वा क्रोध भाव आणू नये.

शुभ काळ

एकादशी तिथी प्रारंभ : 22 फेब्रुवारी 2021, सोमवारी संध्याकाळी 5 वाजून 16 मिनिटे

एकादशी समाप्ती तिथी : 23 फेब्रुवारी 2021, मंगळवारी संध्याकाळी 06 वाजून 05 मिनिटे

पारायण शुभ वेळ : 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजून 51 मिनिटांपासून, सकाळी 9 वाजून 9 मिनिटांपर्यंत.

(Jaya Ekadashi 2021 Vrat katha and pooja vidhi)

व्रताची कथा

पौराणिक कथेनुसार, एकदा नंदन जंगलात उत्सव चालू होता. सर्व देवता, संत आणि दिव्य पुरुष या उत्सवात सहभागी झाले होते. गंधर्व गात होते आणि गंधर्व कन्या नाचत होत्या. या सभेत नृत्यांगना पुष्पावतीला माल्यवान नावाच्या गंधर्वाच्या गाण्याची भुरळ पडली. या तीव्र आकर्षणामुळे, ती संमेलनाचे भान विसरली आणि माल्यवान तिच्याकडे आकर्षित होईल असे नृत्य करू लागली. नृत्य पाहिल्यावर माल्यवानचे भान हरपले आणि तो गाण्याचे सूर-ताल विसरून गेला. त्या दोघांच्याही चुकांमुळे इंद्र संतापला आणि त्या दोघांना स्वर्गातून वंचित होऊन, पृथ्वीवरील अत्यंत वाईट अशा पिशाच्च योनीत जाण्याचा शाप दिला.

शापाच्या परिणामामुळे हे दोघेही पिशाच्च योनीमध्ये जन्माला आले आणि हिमालयातील झाडावर राहू लागले, त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. एकदा दोघे फारच दुःखी झाले, यामुळे त्यांना केवळ फलाहार केला आणि त्या रात्री त्या दोघांचाही थंडीमुळे मृत्यू झाला. तो जया एकादशीचा दिवस होता. दोघांनाही जया एकादशीचा नकळत उपवास घडला म्हणून त्यांना पिशाच्च योनीतून मुक्ती मिळाली.

नंतर ते पूर्वीपेक्षाही सुंदर बनले आणि पुन्हा एकदा त्यांना स्वर्गात जागा मिळाली. जेव्हा देवराज इंद्रांनी तेथे दोघांना पाहिले, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी त्यांच्या मुक्तीचे कारण विचारले. मग त्यांनी सांगितले की, हा भगवान विष्णूच्या जया एकादशीचा प्रभाव आहे. यावर इंद्र प्रसन्न झाले आणि म्हणाले की ते जगदीश्वरांचे भक्त आहेत, म्हणून आतापासून त्यांना दोघांबद्दल आदर आहे, म्हणून ते स्वर्गात आनंदाने विहार करू शकतील.

(टीप : सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, याद्वारे कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही.)

(Jaya Ekadashi 2021 Vrat katha and pooja vidhi)

हेही वाचा :

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.