उलटा स्वस्तिक कधी काढतात? यामागचा नेमका अर्थ काय? जाणून आश्चर्य वाटेल

स्वस्तिक चिन्हाचं प्राचीन काळापासून महत्त्व आहे. पण उलटा स्वस्तिक कधी काढलेली ऐकलं का? पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की उलट्या स्वस्तिकचंही एक महत्त्व आहे. अनेकांना उलट स्वस्तिक काढण्यामागचं कारण माहित नसेल. ते जाणून घेऊयात.

उलटा स्वस्तिक कधी काढतात? यामागचा नेमका अर्थ काय? जाणून आश्चर्य वाटेल
| Updated on: Jan 27, 2025 | 4:01 PM

आपल्याकडे कोणत्याही शुभ प्रसंगी , नवीन वस्तूंची पुजा करताना एवढच काय तर अगदी उंबऱ्यावर अन् दरवाजावर आवर्जून स्वस्तिक काढण्याची परंपरा असते. आणि फक्त परंपराच नाही तर त्यामागे अनेक कराणं आहेत.स्वस्तिक हे प्राचीन भारतीय धार्मिक चिन्ह आहे. त्याचे फार महत्त्व आहे.

स्वस्तिक चिन्हाचं प्राचीन काळापासून महत्त्व

खरंतर स्वस्तिक हे चिन्ह प्राचीन काळापासून शुभ मानले जाते आणि भारतात धार्मिक कार्ये, पूजा आणि तंत्र-मंत्रात त्याचे विशेष स्थान आहे. एकीकडे सामान्य स्वस्तिकाचे चिन्ह जीवनात आनंद, समृद्धी आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. एवढचं नाही तर स्वस्तिक काढताना तो उलट किंवा चुकीच्या पद्धतीने काढला गेला नाही पाहिजे यासाठी काटेकोरपणे नियम पाळले जातात.

उलट स्वस्तिकचे महत्त्व

पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नेहमीच्या स्वस्तिकप्रमाणेच उलट स्वस्तिकचेही तेवढेच महत्त्व आहे. उलट स्वस्तिकबद्दल काही चुकीच्या समजुती नक्कीच आहे. उलटा स्वस्तिक हा अनेक समस्यांवर उपाय म्हणून काढला जातो आणि इच्छापूर्तीसाठीही त्याचा उपयोग केला जाते. पण हा उलट स्वस्तिक कुठेही काढण्यास मनाई असते. उलट स्वस्तिक हा केवळ धार्मिक स्थळांवरच काढला जातो.

उलट स्वस्तिक काढल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि इच्छापूर्ती होते असं म्हटलं जातं. मात्र, उलट स्वस्तिक फक्त धार्मिक मान्यता असलेल्या ठिकाणीच काढावा. स्वस्तिक नेहमी स्वच्छ आणि सुशोभित असावे. तर उलट्या स्वस्तिकाचा वापर अनेकदा विशेष प्रसंगी किंवा कठीण परिस्थितीत केला जातो आणि काही लोकांना त्याचे सकारात्मक परिणाम जाणवतात.

उलटा स्वस्तिक कोणत्या प्रसंगी काढले जाते आणि त्याचा अर्थ काय?

1) उलटा स्वस्तिक काढण्याची परंपरा मुख्यतः अशा ठिकाणी संबंधित आहे, जिथे लोक त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात. जेव्हा एखादी व्यक्ती तीर्थक्षेत्री, मंदिरात किंवा इतर पवित्र ठिकाणी भेट देते आणि तिथे उलटा स्वस्तिक काढते, तेव्हा ते सूचित करते की त्याची इच्छा किंवा समस्या निराकरणासाठी साकडे घातले आहे. असे मानले जाते की उलटा स्वस्तिक काढल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते आणि त्याच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते.

2) जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या विशिष्ट समस्येचा किंवा अडचणीचा सामना करत असते तेव्हा उलटे स्वस्तिकाचे काढले जाते. एवढच नाही तर एखाद्या व्यक्तीची इच्छा पूर्ण झाल्यास त्या व्यक्तीने ज्या र्थक्षेत्री किंवा मंदिरात आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी उलट स्वस्तिक काढले होते. त्याच ठिकाणी परत जाऊन ती व्यक्ती तिची इच्छा पूर्ण झाल्यावर सरळ स्वस्तिक काढते.कारण त्या माध्यामातून देवाचे आभार मानते आणि कृतज्ञता व्यक्त करते.

3) तथापि, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की उलट स्वस्तिक केवळ अशा ठिकाणी बनवले जावे जेथे त्याला धार्मिक मान्यता आहे. घरी उलट स्वस्तिक शक्यतो काढू नये. कारण त्यामुळे पूजेचा पूर्ण लाभ मिळत नाही आणि ते शुभ मानले जात नाही असं म्हणतात. स्वस्तिक नेहमी स्वच्छ आणि सुंदर स्वरूपात बनवले पाहिजे, जेणेकरून त्याचा प्रभाव सकारात्मक होतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)