27 नक्षत्रापैकी रोहिणी नक्षत्रच का ठरते सरस? पुजेसाठी शुभ का मानलं जाते? जाणून घ्या कारण

हिंदू धर्मानुसार, 27 नक्षत्र असून प्रत्येक नक्षत्राचं महत्त्व आहे. त्यापैकी रोहिणी नक्षत्र सर्वात शुभ आणि प्रभावी मानलं जातं. ज्योतिषशास्त्र आणि पुराणानुसार सौभाग्य, समृद्धीचं प्रतीक मानलं गेलं आहे. चला जाणून घेऊयात असं का ते....

27 नक्षत्रापैकी रोहिणी नक्षत्रच का ठरते सरस? पुजेसाठी शुभ का मानलं जाते? जाणून घ्या कारण
27 नक्षत्रापैकी रोहिणी नक्षत्रच का ठरते सरस? पुजेसाठी शुभ का मानलं जाते? जाणून घ्या कारण
Image Credit source: unsplash
| Updated on: Aug 15, 2025 | 7:02 PM

ज्योतिषशास्त्रानुसार, कोणताही शुभ मुहूर्त काढण्यापूर्वी नक्षत्र पाहिलं जातं. कारण 27 नक्षत्रांपैकी काही नक्षत्र ही शुभ आहेत. त्यामुळे त्या दिवशी केलेल्या शुभ कार्याचं फळ अधिक मिळतं. 27 नक्षत्रापैकी रोहिणी नक्षत्र सर्वात शुभ नक्षत्र आहे. हे नक्षत्र धार्मिक पूजा विधी करण्यासाठी सर्वात शुभ गणलं गेलं आहे. पण रोहिणी नक्षत्र इतकं खास असण्याचं कारण काय? तर त्या मागे धार्मिक आणि पौराणिक मान्यता आहेत. रोहिणी नक्षत्र हे भगवान कृष्णाशी निगडीत आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार, भगवान विष्णुंचा आठवा अवतार श्रीकृष्ण या नक्षत्रावर जन्माला आला होता. त्यामुळे रोहिणी नक्षत्र हे प्रेम,सौंदर्य आणि मातृत्वाचं प्रतीक मानलं गेलं आहे. कृष्णाष्टमीला जेव्हा कधी हे नक्षत्र पडतं तेव्हा त्या दिवशी केलेल्या पुजेचं महत्त्व अधिक वाढतं.

चंद्र हा 27 नक्षत्रांचा अधिपती आहे. पण रोहणी नक्षत्र ही चंद्राची सर्वात प्रिय पत्नी मानली गेली आहे. यामुळे या नक्षत्रावर चंद्राची विशेष कृपा आहे. मान्यतेनुसार, या नक्षत्रावर केलेल्या पुजेला चंद्राचा आशीर्वाद मिळतो आणि मनाची शांतीही लाभते. ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीत रोहिणी नक्षत्र येते. त्याचा स्वामी ग्रह चंद्र आहे. चंद्र हा मन, भावना आणि मातृत्वाचं प्रतिनिधित्व करतो. जेव्हा चंद्र रोहिणी नक्षत्रात असतो, तेव्हा सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे या नक्षत्राचं महत्त्व अधिक आहे. या नक्षत्रावर केलेल्या अनुष्ठांनाचं फळ दीर्घ काळापर्यंत मिळतं. त्यामुळे विवाह, गृहप्रवेश या मुहूर्तावर केलेल्या शुभ ठरतो.

रोहिणी नक्षत्रात पूजा कशी कराल?

रोहिणी नक्षत्रावर पूजा करण्याचे काही खास नियम आहेत. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. भगवान श्रीकृष्ण, माता रोहिणी आणि चंद्राची पूजा करा. त्यांना फूले, फळे आणि मिठाई अर्पण करा. या दिवशी ‘ॐ रोहिण्यै नमः’ किंवा श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप करा. या दिवशी गरीब आणि गरजूंना दान केल्यास अधिकचं पुण्य लाभतं.

(Disclaimer: या बातमीत दिलेली माहिती धार्मिक आणि ज्योतिषीय नियमांवर आधारित आहे. TV9 मराठी याची पुष्टी करत नाही.)