Sankashti Chaturthi : आज संकष्टी चतुर्थीला करा हे सोपे उपाय, बाप्पाच्या कृपेने होतील सर्व मनोकामना पुर्ण

| Updated on: Jun 07, 2023 | 12:00 PM

से म्हटले जाते की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांच्या जीवनातील अडथळे आणि संकटे दूर होतात. व्रत आणि उपासना व्यतिरिक्त शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत.

Sankashti Chaturthi : आज संकष्टी चतुर्थीला करा हे सोपे उपाय, बाप्पाच्या कृपेने होतील सर्व मनोकामना पुर्ण
गणपती
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : आज 07 जून रोजी ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) आहे. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही विशेष मानली जाते. या दिवशी विधीपूर्वक गणेशाची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांच्या जीवनातील अडथळे आणि संकटे दूर होतात. व्रत आणि उपासना व्यतिरिक्त शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनात सुख प्राप्त होते. चला जाणून घेऊया गणेशाला प्रसन्न करण्याचे उपाय.

आज संकष्टी चतुर्थीला करा हे सोपे उपाय

  1. जर आपला जीवन साथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर आज एक कच्चा सुती लांब दोरा घेऊन गणपतीसोमर ठेवावा. ऊँ विघ्नेश्वराय नम: मंत्र 11 वेळा जपावे. नंतर देवाची प्रार्थना करून दोर्‍यला सात गाठी बांधून स्वत:जवळ ठेवावा. असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल.
  2. व्यवसाय संबंधी समस्यांपासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे. गणेश चालीसाचा पाठ करावा. चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात.  गणपतीला शेंदूर अर्पित करावे. गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने सन्मान, बल प्राप्ती होईल.
  3. ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर स्थितीत असेल किंवा बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर  गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून त्याची नियमित पूजा करावी. या उपायाने तुम्हाला फायदा होईल.
  4. ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाचा दोष दूर करण्यासाठी किंवा अनेक दिवसांपासून अडकलेली महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मंदिरात जाऊन हिरव्या वस्तूंचे दान करावे. याशिवाय गरजूंना हिरवे कपडे आणि उपयोगी वस्तू दान करणे फायदेशीर मानले जाते.
  5. श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तांदळात हिरवी मूग डाळ मिसळून गरजूंना दान करावे. याशिवाय भिजवलेली हिरवी मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घालून गणपतीचा आशीर्वाद मिळवू शकता.
  6. कुटुंबातील आनंद, सुख-समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ऊँ गं गणपतये नम: मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील. सुख-समृद्धीत वृद्धी होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)