सर्वपित्री अमावस्येला करा तुळशीचे हे उपाय, मिळेल पितरांचे आशीर्वाद आणि भगवान विष्णूंची कृपा
Sarva Pitri Amavasya 2026: १० ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात या दिवसाला पितरांचे स्मरण आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विशेष महत्त्व आहे. या दिवशी तुळशीशी संबंधित कोणते उपाय करावेत, जाणून घ्या.

पितृपक्षातील सर्वपित्री अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि दानधर्म केला जातो. यंदा १० ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी तुळशीची पूजा करणे आणि तुळशीशी संबंधित काही खास उपाय करणे शुभ मानले जाते. भगवान विष्णूंना प्रिय असलेल्या तुळशीची पूजा केल्याने पितरांचा आशीर्वाद आणि घरात सुख-समृद्धी लाभते, असे म्हटले जाते. त्यामुळे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तुळशीशी संबंधित कोणते उपाय करावेत आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे जाणून घ्या.
तुळशीच्या कुंडीत १०८ गाठींचा धागा बांधा
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पिवळ्या रंगाचा धागा किंवा लाल कलावा घ्या. त्याला १०८ गाठी बांधा. त्यानंतर हा धागा तुळशीच्या कुंडीत बांधा. असे करताना घरात सुख-समृद्धी नांदावी आणि पितरांचा आशीर्वाद मिळावा, अशी प्रार्थना करा. धार्मिक मान्यतेनुसार, या उपायामुळे आर्थिक अडचणी दूर होऊन घरात भरभराट येते.
संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा
या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. दिवा लावल्यानंतर तुळशीची सात किंवा अकरा वेळा प्रदक्षिणा घाला. धार्मिक मान्यतेनुसार, यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा लाभते. तसेच घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, यासाठी प्रार्थना करा.
तर्पणानंतर तुलसी चालीसाचे पठण करा
सर्वपित्री अमावस्येला पितरांच्या स्मरणार्थ तर्पण आणि श्राद्ध करण्याची परंपरा आहे. तर्पणानंतर तुलसी चालीसाचे पठण करणे देखील शुभ मानले जाते. तुळशीला भगवान विष्णूंची प्रिय मानले जाते. त्यामुळे तुळशीचे स्मरण आणि स्तुती केल्याने पितरांचे आशीर्वाद मिळतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
तुळशीशी संबंधित नियमांचे पालन करा
धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत आणि तुळशीची नियमित पूजा करणेही टाळावे. असे मानले जाते की, या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास माता लक्ष्मी नाराज होऊ शकतात. त्यामुळे तुळशीशी संबंधित कोणताही उपाय करताना धार्मिक परंपरांचे पालन करावे.
तुळशीच्या मंत्रांचा जप करा
या दिवशी तुळशीचे स्मरण करताना ‘महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी, आधि व्याधि हरा नित्यं तुलसी त्वं नमोस्तुते॥’ याचा जप करू शकता. तसेच ‘ॐ तुलसीदेव्यै च विद्महे, विष्णुप्रियायै च धीमहि, तन्नो वृन्दा प्रचोदयात्॥’ या तुलसी गायत्री मंत्राचा जप करू शकता. धार्मिक मान्यतेनुसार, तुळशीची स्तुती केल्याने भगवान विष्णूंची कृपा लाभते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)