Shani Pradosh Vrat 2021 : शनी प्रदोषच्या दिवशी करा हे विधी, उपाय, घरात येईल सुख समृद्धी

| Updated on: Apr 24, 2021 | 11:20 AM

हिंदू धर्मात प्रदोष व्रताला महत्वाचं स्थान आहे. प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीच्या तिथीला हा व्रत केला जातो. (Shani Pradosh Vrat 2021: Do this ritual, remedy, on the day of Shani Pradosh, happiness and prosperity will come to the house)

Shani Pradosh Vrat 2021 : शनी प्रदोषच्या दिवशी करा हे विधी, उपाय, घरात येईल सुख समृद्धी
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात प्रदोष व्रताला महत्वाचं स्थान आहे. प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीच्या तिथीला हा व्रत केला जातो. यादिवशी भक्त महादेवाची पुजाअर्चा करतात. प्रदोष व्रताच्या दिवशी महादेव पार्वतीची पुजा केली तर मनोकामना पूर्ण होतात. यावेळेसचा प्रदोष व्रत शनीवारी येतो आहे, त्यामुळे शास्त्रांमध्ये त्याला शनी प्रदोष व्रत म्हटलं जातं. प्रदोष व्रत कुठल्या दिवशी येतो त्यावरुन त्याचं महत्व वाढतं. यावेळेस महादेव पार्वतीसोबत शनीदेवाचाही आशीर्वाद मिळणार. (Shani Pradosh Vrat 2021)

शनी प्रदोष व्रताच्या दिवशी पुजापाठ केल्यानं ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांना संतान प्राप्ती होऊ शकते. यादिवशी तिळाचा  भोग लावा. गरीबांना अन्नदान करा. चला बघुया शनी प्रदोष व्रताच्या दिवशी काय केलं म्हणजे घरात सुख समृद्धी येते.

शनी प्रदोष व्रताच्या दिवशी हे उपाय करा……
1. शनी प्रदोषच्या दिवशी महादेवाच्या पुजेसोबतच शनीदेवाचीही पुजा करा. असं केल्यानं मनोकामना
पूर्ण होतात.

2.आजच्या दिवशी कास्याच्या भांड्यात तिळाचं तेल टाकून त्यात चेहरा बघितल्यानंतर दानधर्म केला पाहिजे.
त्यामुळे घरात सुख समृद्धी राहील.

3. शनीला प्रसन्न करण्यासाठी काळे उडीत वाहत्या पाण्यात सोडून द्या.

4. यादिवशी काळे कपडे दान केल्यानं शनी देवाची कृपा कायम रहाते. सोबतच घरात धन आणि यशाचा
योग कायम रहातो.

5. यादिवशी पुजा केल्यामुळे शनीची साढेसाती आणि शनी दोषांपासूनही मुक्तता मिळते.

पुजेचा शुभ मुहुर्त……

या वेळेस शनी प्रदोष व्रताच्या दिवशी ध्रुव योग आहे. हा योग सकाळी 11.43 मिनिटांपर्यंत राहील. या योगात सूर्य मेष राशीत, चंद्र सिंह आणि कन्या राशीत असतील. यादिवशी एखाद्या इमारत किंवा भवनाचं काम करणं शुभ असतं. हिंदु पंचांगानुसार 24 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजून 17 मिनिट ते 9 वाजून 3 मिनिटापर्यंत पुजा करण्याचा शुभ मुहुर्त आहे.

शनी प्रदोष व्रताचं महत्व……..
यादिवशी भक्तमंडळी निर्जळ व्रत ठेवतात. काही जण फलाहारही करतात. शनी प्रदोष व्रताच्या दिवशी पुजा पाठ केल्यानं मनोकामना पूर्ण होतात. असं मानलं जातं की, शनी प्रदोष व्रताच्यादिवशी पुजापाठ केला तर संतान प्राप्ती होते.

संबंधित बातम्या

जेव्हा भगवान नरसिंहाला शांत करण्यासाठी महादेवाने घेतला सर्वेश्वर अवतार, जाणून घ्या नेमकं काय घडले?

Kedarnath Temple | पांडवांनी केदारनाथ मंदिर का बनवलं? जाणून घ्या पांडव आणि महादेवाची ही पौराणिक कथा