Ramayan Story : श्री रामाला तीन भाऊच नाही तर एक बहिणसुद्धा होती, रामायणात तीचा उल्लेख का नाही?

पौराणिक कथेनुसार राजा दशरथ यांना तीन राण्या होत्या. पहिली राणी कौशल्या, दुसरी राणी सुमित्रा आणि तिसरी राणी कैकेयी होती. प्रभू राम हे राणी कौसल्येचे पुत्र होते. पण मुलगा रामच्या आधी आई कौशल्याने मुलीला जन्म दिला. ती चार भावांपेक्षा मोठी होती.

Ramayan Story : श्री रामाला तीन भाऊच नाही तर एक बहिणसुद्धा होती, रामायणात तीचा उल्लेख का नाही?
श्री रामाची बहिण शांता
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 29, 2023 | 10:34 AM

मुंबई : मर्यादा पुरुषोत्तम राम यांचे गुण, वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठी वनवासासह विविध घटनांचा रामायणात तपशीलवार उल्लेख आढळतो. यामध्ये प्रभू रामाच्या कुटुंबातील सर्व सदस्य, वनवासात भेटलेले लोक, लंका जिंकणे अशा त्यांच्या जीवनातील सर्व घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. पण प्रभू रामाच्या जीवनाशी निगडीत एक पात्र आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. तसेच या पात्राचा रामायणातही उल्लेख नाही. ही व्यक्तिरेखा प्रभू राम यांची थोरली बहीण शांता आहे. (Sister Of Shri Ram) राजा दशरथाची एकुलती एक मुलगी शांता हिच्याबद्दल काही कथा प्रचलित आहेत.

कौशल्याने दिला होता मुलीला जन्म

पौराणिक कथेनुसार राजा दशरथ यांना तीन राण्या होत्या. पहिली राणी कौशल्या, दुसरी राणी सुमित्रा आणि तिसरी राणी कैकेयी होती. प्रभू राम हे राणी कौसल्येचे पुत्र होते. पण मुलगा रामच्या आधी आई कौशल्याने मुलगी शांताला जन्म दिला. शांता चार भावांपेक्षा मोठी होती. ती कला आणि हस्तकलेत पारंगत होती. शांताही खूप सुंदर होती. पण रामायणात शांताचा उल्लेख न येण्यामागे एक खास कारण होते.

म्हणूनच शांताचा उल्लेख नाही

वास्तविक, राजा दशरथ आणि राणी कौशल्याची कन्या शांता आपल्या कुटुंबासोबत फार काळ राहिली नाही. त्यामुळे रामायणात त्यांचा उल्लेख नाही. यामागेही एक कारण आहे. कथांनुसार, राणी कौसल्येची थोरली बहीण वर्षािणी दीर्घकाळ निपुत्रिक होती. शांताच्या जन्मानंतर ती एकदा तिची बहीण कौशल्या हिला भेटायला आली. मग ती शांता कडे बघून म्हणाला की मुलगी खूप गोंडस आहे, तिला दत्तक घ्यावं. हे वाक्य ऐकून राजा दशरथाने तीला आपली मुलगी दत्तक देण्याचे वचन दिले. रघुकुल नेहमीच ‘जीव जाईल पण वचन मोडणार नाही’ या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते, म्हणून राजा दशरथने आपले वचन पाळले आणि आपली मुलगी दत्तक दिली.

पौराणिक कथांनुसार, भगवान श्रीरामांच्या मोठ्या बहिणीचा विवाह श्रृंगी ऋषीशी झाला होता. हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे शृंगी ऋषींचे एक मंदिर आहे जेथे ऋषी शृंगी आणि रामची बहीण शांता यांची पूजा केली जाते.

वचनबध्दतेत अडकले होते राजा दशरथ

आपले वचन पाळण्यासाठी भगवान रामांना 14 वर्षे वनवास भोगावा लागला होता. त्यांचे वडील दशरथने आपली पत्नी राणी कैकेयीला वचन दिले होते की ती राजा दशरथाला भविष्यात दोन गोष्टी कधीही मागू शकते आणि ते त्याला कधीही अमान्य करणार नाही. याचा फायदा घेत कैकेयीने रामाचा वनवास आणि आपला मुलगा भरतसाठी सिंहासन मागितले होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)