
सनातन धर्मात, गरुड पुराण हे 18 महापुराणांपैकी एक आहे. म्हणूनच, ते खूप महत्वाचे मानले जाते. गरुड पुराणात व्यक्तीच्या पाप-पुण्यासोबतच त्याच्या मृत्यूपासून ते त्याच्या आत्म्याच्या अंतिम प्रवासापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन करण्यात आले आहे. गरुड पुराणानुसार मृत्यू हे जीवनाचे एकमेव सत्य आहे, जे कोणीही टाळू शकत नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ठरलेला असतो तेव्हा तो येतोच. म्हणूनच, पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाच्या मृत्यूची वेळ ही ठरलेली असते असे म्हटले जाते. पण फक्त गरूड पुराणच नाही तर असे अनेक चिन्हे आहेत ज्यामुळे मृत्यूचा अंदाज लावता येतो. चला जाणून घेऊयात अशी कोणती चिन्हे आहेत ज्यांच्यामुळे मृत्यूबाबत अंदाज लावला जाऊ शकतो.
स्वतःची सावली न दिसणे
गरुड पुराणात असे म्हटले आहे की जर कोणत्याही व्यक्तीला त्याची सावली दिसणे बंद झाले तर ते त्याच्यासाठी मृत्यूचे संकेत असतात. शास्त्रांप्रमाणे मृत्यूच्या काही दिवस आधी त्या व्यक्तीला स्वत:ची सावली दिसेणासी होते.
पूर्वजांचे आवाहन
जर एखाद्या व्यक्तीला अचानक त्याचे पूर्वज दिसू लागले किंवा वारंवार त्यांचे स्वप्न पडू लागले, तर त्या व्यक्तीच्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे असा त्याचे संकेत असतात.
यमदूताचे दर्शन
गरुड पुराणानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीचे जीवन संपुष्टात येते तेव्हा त्याच्या आजूबाजूला अनेक चिन्हे दिसू लागतात. असे मानले जाते की जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा एखाद्या व्यक्तीला मृत्यूचे दूत दिसू लागतात, ज्यामुळे त्याला असे वाटते की कोणीतरी त्याला घेऊन जाण्यासाठी आले आहे. या काळात, व्यक्तीला काही नकारात्मक शक्तीची उपस्थिती देखील जाणवते.
केलेली सर्व कृत्ये आठवणे
असेही म्हटले जाते की शेवटच्या क्षणी, एखाद्या व्यक्तीला त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मांची झलक दिसू लागते. जर एखाद्या व्यक्तीला अचानक हे अनुभवायला मिळाले तर तो त्याचा मृत्यूच्या जवळ आल्याचे लक्षण मानले जाते.
हाताच्या रेषांमध्ये बदल
याव्यतिरिक्त, हाताच्या रेषांमधील बदल देखील एक महत्त्वाचे लक्षण मानले जातात. कधीकधी, एखाद्या व्यक्तीच्या तळहातावरील रेषा फिकट होऊ लागतात किंवा पूर्णपणे नाहीशा होतात, ज्यामुळे शेवट जवळ येत असल्याचे संकेत मानले जातात.
मृत्यूचे दार पाहणे
मृत्यूच्या काही काळापूर्वी आणखी एक रहस्यमय अनुभव येतो. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला एक विचित्र दरवाजा किंवा रस्ता दिसतो, भासतो. गरुड पुराणात हे जवळ येत असलेल्या अंताचे लक्षण म्हणून वर्णन केले आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)