
ज्योतिषशास्त्रात आपल्या सर्वच गोष्टींबद्दल काहीना काही संदर्भ सांगितला आहे. काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती झोपते तिची जास्त ऊर्जा खर्च होते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात सांगतिल्याप्रमाणे काही गोष्टी झोपताना सोबत ठेवल्या किंवा उशीखाली ठेवल्या तर नक्कीच त्याचा फरक आयुष्यावर पडतो. पाहुयात त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या.
कात्री
अनेकदा आपण हे ऐकलं असेल की जेव्हा जेव्हा मुले झोपताना घाबरतात तेव्हा त्यांच्या उशीखाली कात्री किंवा चाकू ठेवावा असं म्हटलं जातं. कारण कात्री आणि चाकू तुमच्याकडे नकारात्मक ऊर्जा येण्यापासून रोखतात. तसेच अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा आयुष्यावर नक्कीच प्रभाव पडतो. उशीखाली चाकू किंवा कात्री सारख्या लोखंडी वस्तू ठेवून झोपल्याने वाईट विचारांना आळा बसतो, नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे येण्यापासून रोखते असं म्हटलं जातं. पण महत्त्वाची टीप म्हणजे चाकू किंवा कात्री ठेवताना त्याला धार नाहीना किंवा त्यापासून आपल्याला ईजा होणार नाही ना याची काळजी घ्यावी.
बडीशोप
एका पांढऱ्या कपड्यात बडीशेप बांधून झोपण्यापूर्वी उशीखाली ठेवल्याने राहु दोष दूर होण्यास मदत होते. असे केल्याने तुम्हाला भयानक स्वप्ने आणि मानसिक समस्यांपासून मुक्ती मिळते. या उपायाने राहूचा वाईट प्रभाव कमी होतो.
लवंग
झोपताना उशीखाली लवंग ठेवल्याने तुमच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा पसरते. हे नकारात्मक ऊर्जा काढून टाकून चांगली झोप घेण्यास मदत करेल.
दागिने
उशीजवळ सोन्याचे किंवा चांदीचा एखादा तरी दागिना घालून झोपावं. यामुळे मंगल दोष दूर होतो असं म्हटलं जातं.
लसूण
जर तुमच्या आयुष्यात नकारात्मकता आली असेल आणि तुमच्या मनात वारंवार वाईट विचार येत असतील तर तुम्ही उशीखाली लसूण ठेवून झोपू शकता.
पुस्तक
परीक्षेची भीती वाटत असेल तर त्यातील एखादं पुस्तक उशीखाली ठेवून झोपल्याने तुम्हाला यश नक्कीच मिळते.
लोखंडी किल्ली
तुमचा वेळ नीट जात नसेल, तुमची नियोजित कामे अनेकदा बिघडत असतील किंवा तुम्हाला रात्री भयानक स्वप्न पडत असतील तर उशीखाली लोखांडाचं छोट्या गोळ्या मिळतात ते ठेवून झोपलं तरी चालेल. लोखंडी गोळ्या उपलब्ध नसल्यास, तुम्ही त्यांना लोखंडी किल्ली देखील ठेवू शकता. असे मानले जाते की, यामुळे राहू आणि केतूचे वाईट प्रभाव दूर होतात आणि जीवनात शांती येते.
वास्तू उपाय
वास्तूमध्ये विशेष उपाय म्हणूनही मूग डाळ सांगितली आहे. त्यानुसार मंगळवारी रात्री मूग डाळ हिरव्या कपड्यात बांधून उशीखाली ठेवून झोपावे. सकाळी उठल्यावर कुमारी मुलीला दान करा किंवा मंदिराजवळील एखाद्या झाडाखाली वाहिले तरी चालेल. असे केल्याने बुध ग्रहाचा अशुभ प्रभाव दूर होतो आणि करिअरमध्ये प्रगती होते असं म्हटलं जातं.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)