मुंगूस दिसताच सर्वात आधी करा हे काम, घरात येईल एवढा पैसा की मोजताही येणार नाही
हिंदू धर्मशास्त्रामध्ये मुंगूस या प्राण्याला खूप शुभ मानलं गेलं आहे. मुंगूसाचं दर्शन होणं हा एक चांगला संकेत असतो असं शकुन शास्त्र सांगतं.

हिंदू धर्मशास्त्रानुसार असे काही प्राणी आहेत, त्यांना शुभ मानलं गेलं आहे, त्यामध्येच मुंगसाचा देखील समावेश होतो. मुंगूस हा तसा भित्रा प्राणी आहे, त्याचा वावर हा मानवी वस्तीच्या आसपास अनेकदा आढळून येतो, जंगलामध्ये देखील मुंगूस दिसतात. मुंगसाला शकून शास्त्रामध्ये देखील शुभ मानण्यात आलं आहे. शकून शास्त्रानुसार तुम्ही जर एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाणार असाल आणि वाटेत तुम्हाला जर मुंगूस दिसलं तर तो तुमच्यासाठी एक शुभ संकेत असतो. याचाच अर्थ तुम्ही जे काम करण्यासाठी निघाला आहात, त्या कामात तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार असा होतो, असं शकून शास्त्र सांगतं.
मुंगूस आणि सापाचा कायम छत्तीसचा आकडा असतो, साप कुठेही दिसला की मुंगूस त्याच्यावर हल्ला करतो. त्यामुळे ज्या घराच्या परिसरात किंवा जिथे मुंगूस मोठ्या प्रमाणात आढळतात, त्या परिसरामध्ये शक्यतो साप आढळून येत नाही, आणि तुमचं देखील सांपापासून संरक्षण होतं. मुंगूस हा निरोपद्रवी प्राणी मानला जातो, मात्र स्वत:च संरक्षण करण्यासाठी तो कधीकधी हल्ला देखील करू शकतो.
मुंगसला विष्णू देवाचं प्रतीक मानलं जातं. जर तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यानंतर सर्वात आधी मुंगूसाचं दर्शन झालं तर तो दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे असं मानलं जातं. तुमचे सर्व कामे मार्गी लागणार याचे ते संकेत असतात. दरम्यान तुम्हाला जर कुठे मुंगूस दिसलं तर शकून शास्त्रामध्ये सांगितल्या प्रमाणे मुंगूस जिथून गेलं आहे, तेथील माती एका वाटीमध्ये घ्या. ती वाटी तुमच्या घरातील देवघरासमोर ठेवा, एक उदबत्ती लावा, त्या वाटीची पूजा करा आणि 11 वेळेस ओम नमो नारायणाचा जप करा. यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती दूर होऊन सकारात्मक शक्तीचा घरात प्रवेश होतो. तुमचं कोणतंही काम अडलं असेल तर ते पूर्ण होतं, एवढंच नाही तर तुमच्या घरामध्ये धनाचा वर्षाव होतो. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या घरात सदैव राहाते असं शकून शास्त्रामध्ये सांगितलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
